Ved Movie Release Date: "प्रेम.. प्रेम असतं समुद्रासारखं.. कुणाच्या नशीबी लाट, कुणाच्या नशीबी काठ... प्रेम मुठीतल्या वाळूसारखं... मूठ आता भरलेली, आता नाही... पण प्रेम असतं प्रेमासारखंच.. काही वेड्यासारखे प्रेम करतात.. काही प्रेमातलं वेड होतात.." असं म्हणत अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) वेड (Ved) या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या 30 डिसेंबरला रितेशचा हा मराठी सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमातून रितेश दिग्दर्शकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे. या सिनेमात रितेश आणि जेनेलिया प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. जेनेलिया देशमुखही (Genelia Deshmukh) या सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या सिनेमाचा टीझर आणि गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. (Ved Movie Release Date Riteish Deshmukh and Genelia Deshmukh )
अभिनेता रितेश देशमुखने सिनेमाचा टीझर शेअर करत पोस्टमध्ये लिहिलंय,"एका नव्या प्रवासाची सुरवात करतो आहे. झं दिग्दर्शनातलं पहिलं पाऊल. मनात थोडी आतुरता ..थोडी भीती …पण प्रचंड वेड. आशा आहे आपल्याला आवडेल. आशिर्वाद आणि प्रेम असू द्या.#Ved30Dec"
अधिक वाचा : 'या' दिवशी थिएटरमध्ये झळकणार 'ऑटोग्राफ'
रितेशने सोशल मीडियावर त्याच्या या सिनेमाचा टीझर आणि गाणं रिलीज केलं आहे. ही एक लव्हस्टोरीही आहे हे एव्हाना सिनेमाचा टीझर पाहून प्रेक्षकांच्या लक्षात आलंच असेल. टीझर रिलीज होतात, प्रेक्षकांनी कमेंट्सचा वर्षाव केलेला आहे. या सिनेमातलं गाणंही नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. अजय-अतुल यांचं संगीत ही सिनेमाची जमेची बाजू आहे. नेहमीप्रमाणेच अजय-अतुल त्यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांना 'वेड' लावण्यास सज्ज झाले आहेत.
20 वर्ष रितेशने अभिनयक्षेत्रात कारकीर्द गाजवली आहे. रितेशने अनेक उत्तम सिनेमा बॉलिवूडला दिलेले आहेत. त्याची ही कारकीर्दकेवळ बॉलिवूडपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. तर 'लय भारी' या सिनेमाच्या माध्यमातून रितेशने मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर आता या सिनेमाच्या माध्यमातून रितेश दिग्दर्शनात पदार्पण करत आहे तर अभिनेत्री जेनिलिया देशमुख या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. जेनेलियाने तामिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी आणि तेलुगु या 5 भाषांमध्ये काम केलेलं आहे.
अधिक वाचा : मुलांच्या 'या' 5 गोष्टींकडे पाहून मुली होतात आकर्षित
बॉलिवूडचा दबंग खान अर्थातच सलमान खान या सिनेमात एका छोट्याशा भूमिकेत दिसणार आहे. रितेशने सलमानसोबतचे सेटवरचे फोटोही शेअर केले होते. याआधीही सलमानने रितेश देशमुखच्या 'लय भारी' सिनेमात गेस्ट अपिअरन्स दिला होता. रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुखचा हा 'वेड' 30 डिसेंबरला रिलीज होणार आहे.