आपल्या सासऱ्यांच्या जवळची होती काजोल, अखेरच्या काळात केली सेवा

बी टाऊन
Updated May 27, 2019 | 18:44 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Veeru Devgan :अभिनेता अजय देवगणला पितृशोक झालाय. ते घरी जेवत असताना अचानक खूर्चीवरून खाली पडले. काजोल सासऱ्यांची परिस्थिती पाहून लगेच त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. पण त्यांनी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला

Kajol and Veeru Devgan
अखेरच्या काळात काजोलच होती सासऱ्यांसोबत 

मुंबई: अभिनेता अजय देवगणचे वडील आणि ज्येष्ठ स्टंटमास्टर वीरू देवगण यांचं आज सकाळी निधन झालं. अभिनेत्री काजोलचं आपल्या सासऱ्यांसोबत घनिष्ठ नातं होतं. ती नेहमीच वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये सासऱ्यांसोबत स्पेशल बॉन्डिंग शेअर करताना दिसायची. वीरू देवगण यांना ती आपल्या वडिलांप्रमाणेच मानत होती. हेच कारण आहे की, अखेरच्या वेळी तिनं आपल्या सासऱ्यांची सेवा केली, त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली.

अमर उजालच्या रिपोर्टनुसार आज सकाळी वीरू देवगण आपल्या घरी जेवत असताना अचानक ते खूर्चीवरून खाली पडले. तिथं उपस्थित असलेल्या काजोलनं त्यांना लगेच सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. काजोल एकटीच त्यांच्यासोबत अखेरच्या काळात होती. मुलगा अजय देवगण पण तेव्हा उपस्थित राहू शकला नाही.

अभिनेता अजय देवगण सध्या आपला आगामी चित्रपट ‘तानाजी’च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. त्यामुळे जेव्हा ही घटना घडली तो घरी नव्हता. वडिलांच्या निधनाची बातमी कळताच तो लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचला. त्यामुळे त्याला वडिलांचे अंत्यदर्शन घेता आले. वीरू देवगण यांच्या पार्थिवावर विलेपार्ले इथल्या स्मशानभूमित संध्याकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

वीरू देवगण यांनी अनेक चित्रपटांमध्ये ऍक्शन सीनचं दिग्दर्शन केलं आहे. यात विशेष म्हणजे  'आज का अर्जुन', 'राम तेरी गंगा मैली हो गई', 'दिलजले', 'एक ही रास्ता', 'प्रेम रोग', 'आखिरी रास्ता', 'सोने पे सुहाना', 'खूब भरी मांग' या चित्रपटांचा समावेश आहे. १९९९ मध्ये आलेल्या ‘हिंदुस्तान की कसम’ या चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शनही केलं होतं. ही गोष्ट तर खूप कमी लोकांना माहितीय की, त्यांनी तीन चित्रपटांमध्ये अभिनयही केला आहे. ते तीन चित्रपट म्हणजे 'क्रांति', 'सौरभ' आणि  'सिंहासन' आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
आपल्या सासऱ्यांच्या जवळची होती काजोल, अखेरच्या काळात केली सेवा Description: Veeru Devgan :अभिनेता अजय देवगणला पितृशोक झालाय. ते घरी जेवत असताना अचानक खूर्चीवरून खाली पडले. काजोल सासऱ्यांची परिस्थिती पाहून लगेच त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. पण त्यांनी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles