Tabassum Govil Death: 'फुल खिले है गुलशन गुलशन'चा चेहरा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांचे निधन

बी टाऊन
Updated Nov 19, 2022 | 20:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

Tabassum Govil Death: बॉलिवूड अभिनेत्री तबस्सुम गोविल (Tabassum Govil) यांचे निधन झाले आहे. हृदय विकाराच्या झटक्याने तबस्सुम यांचे निधन (tabassum govil died) झाले आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी तबस्सुम यांनी अखेरचा श्वास घेतला. 'फुल खिले हैं गुलशन गुलशन' या चॅट शोमुळे तबस्सुम घराघरात प्रसिद्ध झाल्या होत्या.

Veteran actor tabassum govil died at 78 year due to cardiac arrest
ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांचे निधन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांचे निधन
  • 'फुल खिले है गुलशन गुलशन'या चॅटमुळे मिळाली ओळख
  • 78 व्या वर्षी तबस्सुम यांनी घेतला अखेरचा श्वास

Tabassum Govil Death: हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तबस्सुम गोविल (Tabassum Govil) यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन (tabassum govil died) झाले आहे. वयाच्या 78 व्या वर्षी तब्बसुम यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ' फुल खिले हैं गुलशन गुलशन' या टॉक शोमधून तबस्सुम यांनी करिअरची सुरुवात केली. या शोमुळे त्यांना घरोघरी ओळख मिळाली. हा शो दूरदर्शनवर एक-दोन नव्हे तर तब्बल 21 वर्ष सुरू होता. 1972 मध्ये सुरू झालेला हा शो 1993 पर्यंत चालला. तबस्सुम यांची कारकीर्द या शोमुळे खऱ्या अर्थाने घडली. (Veteran actor tabassum govil died at 78 year due to cardiac arrest)

अधिक वाचा : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीला धमकी

रामायणातील अरुण गोविल यांच्याशी खास नाते

तबस्सुम यांचा विवाह अरुण गोविल यांचा भाऊ विजय गोविल याच्यांशी झाला होता. नात्याने तब्बसुम अरुण गोविल यांच्या वहिनी होत्या. तबस्सुम आणि विजय यांना होशंग नावाचा मुलगा आहे.


तबस्सुम यांचा मुलगा होशांगने सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांना कोणताही आजार नसल्याचं त्यांच्या मुलाने सांगितले.  10 दिवसांपूर्वी एक शो देखील तबस्सुम यांनी शूट केला होता.  पुढील आठवड्यापासून त्यांना पुन्हा शूट करायचे होते आणि अचानक असं घडले. 

अधिक वाचा : टॅनिंगमुळे आलेला पायांचा काळेपणा दूर करणारे 5 उपाय

तबस्सुम अयोध्येच्या आहेत. त्यांचा जन्म स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबात झाला.  त्यांचं शिक्षण मुंबईत झालं. तबस्सुम यांनी 1947 मध्ये 'मेरा सुहाग' चित्रपटातून बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात तबस्सुम यांनी नर्गिसच्या बालपणीची व्यक्तिरेखा साकारली होती. तबस्सुम 40 आणि 50 च्या दशकापासून मोठ्या स्टार्ससोबत काम करत होत्या. बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या तबस्सुमने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'बहार' आणि 'जोगन' या चित्रपटांचा या यादीत यांचा समावेश आहे. मात्र, त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती दूर्शदर्शनवरील चॅट शो 'फुल खिले है गुलशन गुलशन'मुळे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी