Sunil Shende death : ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

बी टाऊन
Updated Nov 14, 2022 | 14:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sunil Shende death : मराठी सिने इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन (Sunil Shende Passes Away) झाले आहे. रात्री 1 च्या सुमारास त्यांचे मुंबईतील विलेपार्ले इथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थीवावर पारशीवाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

veteran Marathi senopr Actor Sunil Shende Passes Away
ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे काळाच्या पडद्याआड  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे काळाच्या पडद्याआड
  • मुंबईतल्या विलेपार्ले इथे राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
  • मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

Sunil Shende death : मराठी सिने इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन (Sunil Shende Passes Away) झाले आहे. रात्री 1 च्या सुमारास त्यांचे मुंबईतील विलेपार्ले इथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थीवावर पारशीवाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (veteran Marathi senopr Actor Sunil Shende Passes Away)

अधिक वाचा : सोमवारी करा हे उपाय, शंकराच्या कृपेने घरात लक्ष्मी नांदेल

Sमराठी सिने इंडस्ट्रीतून सध्या दु:खद बातम्या समोर येत आहेत. रविवारी स्मॉल स्क्रीनवरची अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव हिचा अपघाती मृत्यू झाला. तिच्या जाण्याने सिनेवर्तुळातून हळहळ व्यक्त होत असतानाच दुसरी दु:खद बातमी समोर आली. मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन (Sunil Shende Passes Away) झाले आहे. रात्री 1 च्या सुमारास त्यांचे मुंबईतील विलेपार्ले इथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थीवावर पारशीवाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते 75 वर्षांचे होते. 


सुनील शेंडे यांनी हिंदी तसेच मराठी सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केलेली होती. रुबाबदार व्यक्तिमत्व आणि पहाडी, खडा आवाज यामुळे सुनील यांनी बऱ्याच सिनेमांमधून पोलीस, राजकारणी अशा वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. त्यांच्या खड्या आवाजामुळे त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. रंगभूमीवरील एक सशक्त अभिनेता अशी सुनील यांची ओळख होती. निवडुंग (१९८९), मधुचंद्राची रात्र (१९८९), जसा बाप तशी पोर (१९९१), ईश्वर (१९८९), नरसिम्हा (१९९१) या सिनेमांमधून त्यांनी विशेष लोकप्रियता मिळवली. त्यांनी केलेल्या विविध सहाय्यक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मात्र, गेल्या काही काळापासून ते सिनेइंडस्ट्रीपासून दूर होते. गांधी, वास्तव, सरफरोश (Actorv Sunil Shende Movies) या हिंदी सिनेमांमध्ये सुनील शेंडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. 

अधिक वाचा : इंग्लंडवर पैशांचा पाऊस, टीम इंडियाला किती मिळाले पैसे

मराठी तसंच हिंदी सिनेसृष्टीत काम केलेल्या सुनील शेंडे यांच्या पश्चात पत्नी ज्योती, दोन मुले ऋषिकेश आणि ओंकार, त्याचप्रमाणे सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. अभिनेत्याच्या जाण्याने मराठी सिनेविश्वात न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाने सिनेवर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी