Vicky Kaushal-Katrina Kaif Marriage : विकी कौशल-कतरिना कैफ आधी कोर्ट मॅरेज करणार, नंतर होणार शाहीविवाह सोहळा

Marriage : विकी कौशल आणि कतरिना कैफ पुढच्या आठव़ड्यात कोर्ट मॅरेज करणार असल्याची बातमी समोर आलीय. त्यानंतर हे दोघंही राजस्थानला शाही विवाह सोहळ्यासाठी रवाना होणार असल्याचं समजतंय. यादोघांनीही अद्याप याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.

Vicky-Katrina will have a court marriage, followed by a royal wedding
विकी कौशल-कतरिना कैफ पुढच्या आठवड्यात करणार कोर्ट मॅरेज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बँण्ड... बाजा... बारात
  • विकी कौशल आणि कतरिना कैफची लगीनघाई
  • आधी कोर्ट मॅरेज मग शाही विवाह सोहळा


Marriage : कतरिना कैफ आणि विकी कौशल दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी आपले नाते लोकांपासून लपवून ठेवले आहे. 
आता दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार असले तरी दोघंही याबाबत उघडपणे बोललेले नाही. दोघांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू असली असल्याचं समजतंय. शाही लग्नासाठी ते लवकरच राजस्थानच्या जयपूरला रवाना होणार आहेत. मात्र, आधीच्या वृत्तानुसार, दोघेही पुढच्या आठवड्यात कोर्ट मॅरेज करणार आहेत त्यानंतर लवकरच ते आपल्या लग्नासाठी राजस्थानला पोहोचणार आहेत.

True or False: Vicky Kaushal and Katrina Kaif are more than 'just friends'  | Hindi Movie News - Times of India


आधी कोर्ट मॅरेज होईल

कतरिना आणि विकी कौशल राजस्थानमध्ये होणाऱ्या शाही विवाहापूर्वी पुढील आठवड्यात मुंबईत कोर्ट मॅरेज करणार आहेत. कोर्ट मॅरेजनंतर लवकरच तो जयपूरमध्ये पूर्ण विधींनी दोनदा लग्न करणार असल्याची माहिती समोर आलीय.

Katrina Kaif and Vicky Kaushal had roka ceremony on Diwali day | Hindi  Movie News - Times of India
डिसेंबरमध्ये लग्न होईल

 डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दोघेही दोन रितीरिवाजांसह शाही लग्न करणार असल्याचं म्हटलं जातंय. लग्न पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आले आहे. कतरिनाने लग्नामुळे ब्रेक घेतल्याचे समजते. तर विकी कौशलच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्याचा भाऊ आणि आई लग्नाची सर्व तयारी पाहत आहेत. 

Has Katrina Kaif taken a break to prep for her December wedding with Vicky  Kaushal? | Hindi Movie News - Times of India

कतरिना सब्यसाचीचा लेहेंगा परिधान करणार

लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. लग्नाच्या निमित्ताने दोघेही सब्यसाचीच्या डिझायनर वेअरमध्ये दिसणार आहेत. विकी आणि कतरिना राजस्थानमधील सिक्स सीझन फोर्टमध्ये लग्न करणार आहेत. लग्नाला येणार्‍या पाहुण्यांना फोन आणू नका, त्यामुळे त्यांचे लग्न खाजगी राहू शकेल, असे आवाहनही केले जात आहे.

Vicky Kaushal And Katrina Kaif Wedding Preparations: With Vicky Kaushal  busy working, is Katrina Kaif getting help from her future mother-in-law in  wedding preparations?
विक्की कौशलने कतरिनाचं आवडतं चॉकलेट देऊन लग्नासाठी प्रपोज केल्याचे बोलले जात आहे. यानंतर कतरिनाने हो म्हटलं. रिपोर्ट्सनुसार, 
दोघांचा रोका दिग्दर्शक कबीर खानच्या घरी झाला होता. मात्र, या हे दोघंही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे काहीही बोललेले नाहीत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी