Vicky Kaushal Katrina Kaif Reception: विकी कौशल-कतरिना कैफचं रिसेप्शन या दिवशी होणार, कोण असतील खास पाहुणे?

बी टाऊन
Updated Dec 16, 2021 | 10:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding Reception: लग्नानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफ फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींना रिसेप्शन देणार आहेत. तारीख, ठिकाणापासून सर्वकाही जाणून घ्या.

Vicky Kaushal Katrina Kaif Reception
कतरिना कैफ-विकी कौशल 20 डिसेंबरला देणार ग्रॅण्ड रिसेप्शन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • विकी कौशल आणि कतरिना कैफ हे ग्रँड रिसेप्शन देणार आहेत.
  • रिसेप्शनसाठी सलमान खान, रणबीर कपूरसह सेलिब्रिटींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
  • रिसेप्शनला उपस्थित असलेल्या पाहुण्यांना कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल.

Vicky Kaushal Katrina Kaif Wedding Reception: मुंबई :  विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) लग्नानंतर, लवकरच चित्रपटसृष्टीतील (Cinema Industry) त्यांच्या जवळच्या मित्रमंडळींसाठी एक भव्य रिसेप्शन देणार आहेत. हनिमून (Honeymoon) सेलिब्रेट करून हे जोडपे मुंबईत (Mumbai) परतले आहे. रिपोर्ट्सनुसार, या रिसेप्शनमध्ये बी टाऊनचे अनेक मोठे सेलिब्रिटी येणार आहेत. मात्र, लग्नाप्रमाणेच रिसेप्शनमध्येही कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पाहुण्यांना कडक नियमांचे पालन करावे लागणार आहे.


बॉलीवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, विकी कौशल आणि कतरिना 20 डिसेंबर 2021 रोजी मुंबईतील J.W मॅरियट येथे ग्रँड वेडिंग रिसेप्शन (Vicky Kaushal Katrina Kaif Reception Date) देणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी आणि कतरिनाने सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान, रणबीर कपूर, अमिताभ बच्चन यांना रिसेप्शनसाठी आमंत्रण पाठवले आहे जेणेकरून ते या रिसेप्शनसाठी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढू शकतील. याशिवाय ख्रिसमसचा सणही येत आहे, त्याआधी दोघांना रिसेप्शन द्यायचे आहे.

New beginnings! Katrina Kaif, Vicky Kaushal are back in Mumbai, snapped  outside airport - The Economic Times


कोविड नियमांचे पालन केले जाईल

ओमाक्रॉनच्या धमकीला न जुमानता विकी आणि कतरिनाच्या लग्नाचे रिसेप्शन होत आहे. अशा परिस्थितीत बीएससीचे सर्व नियम आणि कोविड प्रोटोकॉल पाळले जातील. 
पाहुण्यांना RTPCR चाचणी करून घ्यावी लागेल आणि त्याचा निगेटिव्ह रिपोर्टही सोबत आणावा लागेल. खरे तर दोघांनाही लग्नाचे फंक्शन लवकरात लवकर आटोपून कामावर परतायचे आहे. या कारणास्तव ते 20 डिसेंबर 2021 रोजीच रिसेप्शन देणार आहे.

हातात लाल बांगड्या, भांगात सिंधूर

विकी कौशल आणि कतरिना कैफ लग्नाच्या चार दिवसांनंतर हनीमूनहून परतले आहेत. नवविवाहित जोडपे मुंबईच्या खाजगी विमानतळ कलिना बाहेर स्पॉट झाले. कतरिना कैफ गुलाबी रंगाच्या सूटमध्ये  सिंदूर आणि हातात लाल बांगड्या घातलेली दिसली.
 

विकी आणि कतरिनाने लग्नाआधीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये कतरिना कैफने डिझायनर सब्यसाचीची पेस्टल ट्यूल साडी घातली आहे. याशिवाय दोघांनी हळदी, संगीत, लग्न आणि प्री-वेडिंग फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

लवकरच नवविवाहित जोडपं नवीन घरात शिफ्ट होणार

विकी आणि कतरिना लवकरच त्यांच्या नव्या घरात शिफ्ट होणार आहेत. जुहू परिसरात दोघांनीही एक फ्लॅट भाड्याने घेतला आहे. 4 बीएचके असलेल्या या फ्लॅटचे इंटिरिअरही पूर्ण झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रिसेप्शनंतर हे कपल आपल्या नवीन घरात शिफ्ट होणार आहे. त्यानंतर लवकरच दोघेही आपापल्या कामावर परतणार आहेत. जानेवारीपासूनकतरिना सलमान खानसोबत टायगर 3 च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. तर विकी कौशलकडेही अनेक प्रोजेक्ट्स आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी