विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नाचे विधी सुरू, कबीर खानच्या घरी झाला रोका

बी टाऊन
Updated Nov 08, 2021 | 15:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी रोकाही केला आहे. दोघांचा रोका कतरिना कैफचा खास मित्र कबीर खान आणि मिनी माथूर यांच्या घरी पार पडला. कबीर खानने कतरिना कैफसोबत एक था टायगरमध्ये काम केले आहे. 

katrina kaif-vicky kaushal
विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नाचे विधी सुरू 
थोडं पण कामाचं
  • कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांनी रोका हा विधीही पूर्ण केला.
  • इंडिया टुडेमध्ये छापलेल्या रिपोर्टनुसार कतरिना कैफच्या एका फ्रेंडने सांगितले की दोघांचा रोका झाला आहे.
  • विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांचा रोका कबीर खानच्या घरी करण्यात आला.

मुंबई: कतरिना कैफ(Katrina Kaif) आणि विकी कौशल(Vicky Kaushal) यांच्या लग्नाच्या चर्चा सध्या जोरदार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोघेही डिसेंबरच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात लग्नबंधनात अडकत आहेत. दरम्यान, अद्याप या दोघांकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही. कतरिना आणि विक्कीच्या कपड्यांपासून ते वेडिंग व्हेन्यूपर्य(Katrina Vicky Wedding Venue)त चर्चा होत आहे. मात्र आता बातमी येत आहे की दोघांच्या लग्नाचे प्री वेडिंग फंक्शनही सुरू झाले आहे. vicky kaushal- katrina kaiif marrige rituals start

कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांनी रोका हा विधीही पूर्ण केला. इंडिया टुडेमध्ये छापलेल्या रिपोर्टनुसार कतरिना कैफच्या एका फ्रेंडने सांगितले की दोघांचा रोका झाला आहे. विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांचा रोका कबीर खानच्या घरी करण्यात आला. कबीर खान कतरिना कैफसोबत एक था टायगरमध्ये काम केले आहे. कतरिना त्याला आपला राखी भाऊ मानते. 

हे फंक्शन पूर्णपणे खाजगी ठेवण्यात आले होते. कतरिनाची मम्मी सुजैन, बहीण इजाबेल कैफशिवाय विक्की कौशलचे वडील शाम कौशल, वीणा कौशल आणि भाऊ सहभागी होता. कपलच्या खास फ्रेंडने रोका बद्दल मोठा खुलासा केला आणि म्हटले, रोकाचा विधी खूप सुंदर पद्धतीने पार पडला. लाईट आणि डेकोरेशनमध्ये कोणतीच कमतरता नव्हती. दिवाळीचा शुभ मुहूर्त होता. म्हणून फॅमिलीने हा दिवस निवडला. कबीर आणि मिनी हे कतरिनाच्या घरातल्यांसारखेच आहेत आणि त्यांनीच हे ठरवले होते. 

विकी अनेकदा कतरिनाच्या घरी दिसला

विकी आणि कतरिनाच्या नात्याच्या अफवा पसरल्यापासून दोघांनीही यावर मौन बाळगले आहे. मात्र, दोघे अनेकदा एकत्र दिसले असून विकी कतरिनाच्या घरी अनेकदा स्पॉट झाला आहे. अलीकडेच 'सरदार उधम' चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये दोघेही दिसले होते. यादरम्यान विकी आणि कतरिनाचा मिठी मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत होता.

अशी सुरू झाली होती लव्हस्टोरी

कतरिना आणि विकी कौशल यांना जुळवून आणण्यात करण जोहरचा मोठा  हात आहे. करण जोहर एक मोठा निर्माता व दिग्दर्शक आहे. सोबत बॉलिवूड पार्ट्यांचा खास होस्टही आहे. करणच्या पार्टीमध्ये अनेकदा विकी आणि कतरिना एकत्र दिसले आहेत. विकी आणि कतरिनाच्या रिलेशनची सुरूवात एकार्थाने करण जोहरच्या 'कॉफी विद करण' या शोमध्ये झाली होती.

2018 मध्ये 'कॉफी विथ करन' या शोमध्ये काऊचवर कतरिना बसली होती. नेहमीप्रमाणे करणने कतरिनाला प्रश्न केला होता. तुझ्यासोबत कोणत्या हिरोची जोडी परफेक्ट दिसेन? असा तो प्रश्न होता. यावर कतरिनाने विकी कौशल असे उत्तर दिले होते. यानंतर यानंतरच्या 'कॉफी विथ करन'च्या एपिसोडमध्ये विकी आणि आयुष्यमान खुराना सहभागी झाले होते. यावेळी करणने अगदी आठवणीने कतरिनाची ही गोष्ट विकीला सांगितली होती. मी आनंदाने बेशुद्ध पडेन, असे ही गोष्ट ऐकल्यानंतर विकी म्हणाला होता. 'कॉफी विद करण'च्या या एपिसोडनंतर जवळजवळ वर्षभरानंतर खरोखर विकी आणि कतरिना सोबत दिसू लागले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी