उरी सिनेमातील अभिनेता विकी कौशलचा अपघात, शूटिंग दरम्यान जखमी

बी टाऊन
Updated Apr 20, 2019 | 11:32 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Vicky Kaushal injured: सर्जिकल स्ट्राइकवर बनवण्यात आलेल्या उरी सिनेमातील अभिनेता विकी कौशल याच्यासोबत अपघात झाला आहे. आपल्या आगामी सिनेमाचं शूटिंग सुरू असताना विकी कौशल जखमी झाला आहे.

Vicky Kaushal meet with accident
अभिनेता विकी कौशल  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेला विकी कौशल जखमी झाला आहे. आपल्या आगामी हॉरर सिनेमाचं शूटिंग करत असताना विकी कौशल जखमी झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विकी कौशल याच्या चेहऱ्यावर गंभीर जखम झाली आहे. गुजरातमध्ये शूटिंग दरम्यान हा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता विकी कौशल आपल्या आगामी सिनेमाचं शूटिंग करत होता. डायरेक्टर भानुप्रताप सिंह यांच्या हॉरर सिनेमाच्या शूटिंग दरम्यान हा अपघात घडला आहे. या अपघातात अभिनेता विकी कौशल जखमी झाला आहे. विकी कौशल याच्या चेहऱ्यावर जखमी झाली आहे.

या अपघातानंतर तात्काळ विकी कौशल यांच्यावर उपचार करण्यास सुरूवात करण्यात आली. सध्या विकी कौशल याच्यावर उपचार सुरू आहेत. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी एक ट्विट करुन या संदर्भातील माहिती दिली आहे. तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "सिनेमाचं शूटिंग सुरू असताना विकी कौशल जखमी झाला. भानू प्रताप सिंह यांच्या हॉरर सिनेमाच्या शूटिंग दरम्यान गुजरातमध्ये अपघात झाला. या अपघातात विकी कौशलच्या गालाला लागले आहे".

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

How’s the Pose? ...High Sir!

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल याने आपल्या करिअरची सुरूवात २०१५ मध्ये आलेल्या 'मसान' सिनेमातून केली. या सिनेमात केलेल्या उत्कृष्ट अभिनयासाठी विकी कौशल याला इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स नुसार बेस्ट मेल डेब्यूचा पुरस्कार मिळाला होता. यानंतर विकी कौशलने थ्रिलर सिनेमा 'रमन राघव २.०' हा सिनेमा केला. विकी कौशलचा १६ मे १९८८ रोजी मुंबईत जन्म झाला. नुकत्याच आलेल्या 'उरी द सर्जिकल स्टाइक' या सिनेमात केलेल्या भूमिकेमुळे विकी कौशल याने सर्वांचीच मनं जिंकली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
उरी सिनेमातील अभिनेता विकी कौशलचा अपघात, शूटिंग दरम्यान जखमी Description: Vicky Kaushal injured: सर्जिकल स्ट्राइकवर बनवण्यात आलेल्या उरी सिनेमातील अभिनेता विकी कौशल याच्यासोबत अपघात झाला आहे. आपल्या आगामी सिनेमाचं शूटिंग सुरू असताना विकी कौशल जखमी झाला आहे.
Loading...
Loading...
Loading...