[VIDEOS] शाहरुख क्रिकेटर ब्रावोसोबत लुंगी डान्सवर थिरकतो तेव्हा...

बी टाऊन
Updated Sep 09, 2019 | 21:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

शाहरुख खानचा लूंगी डान्स खूप प्रसिद्ध आहे. पण हाच डान्स जेव्हा तो क्रिकेटपटू ड्वेन जॉन ब्रावो म्हणजेज डी जे ब्रावोसोबत याच गाण्यावर थिरकतो तेव्हा त्याचे व्हिडिओज नक्कीच धमाल असतात. पाहा या व्हिडिओजची झलक.

videos of shahrukh khan dancing with cricketer dwayne john bravo go viral
[VIDEOS] शाहरुख क्रिकेपटू डी जे ब्रावोसोबत लूंगी डान्सवर थिरकतो तेव्हा  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • सातासमुद्रापार दिसला शाहरुखचा धमाल अंदाज
  • क्रिकेटपटू डीजे ब्रावोसोबत लूंगी डान्स गाण्यावर थिरकला किंग खान
  • या धमाल 'लूंगी डान्स'चे व्हिडिओ झाले व्हायरल

मुंबई: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख सध्या करिअरमध्ये एका वेगळ्याच फेसमधून जात आहे. त्याचे मागचे काही सिनेमा पाहिजे तितकं यश मिळवू शकले नाहीत. शिवाय सिनेमाचे रिव्ह्यूज सुद्धा हवे तसे आले नाहीत. त्यामुळे शाहरुख सध्या नवीन सिनेमाबद्दल खूप विचारपूर्वक निर्णय घेताना दिसत आहे. त्याचा कुठलाही आगामी सिनेमा अद्यापतरी घोषित झालेला नाही. असं असताना सुद्धा त्याच्या फॅन्ससाठी एक गुड न्यूज आहे. त्याच्या फॅन्ससाठी शाहरुखचा धमाल अंदाज नुकताच टिपला गेला आहे. त्याची झलक तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. शाहरुख सध्या कॅरेबियन आयलंडचा आहे आणि तिथेच त्याची ही धमाल झलक पहायला मिळाली आहे.

तर शाहरुख सध्या कॅरेबियन प्रीमिअर लीगसाठी हजर आहे. त्याची क्रिकेट टीम ट्रिनबागो नाईट रायडर्स या लिगमध्ये खेळत आहे. त्याच्या टीमला चिअर करण्यासाठी शाहरुख सध्या तिथे हजर आहे आणि त्यांचे खेळ पाहत आहे. तिथे तो टीमसोबत धमाल-मस्ती सुद्धा करतो आहे. याच धमाल-मस्तीचा एक धमाल व्हिडिओ नुकताच व्हायरल होताना दिसला. नुकताच शाहरुख त्याच्या टीममधील क्रिकेटपटू ब्रावोसोबत त्याच्या प्रसिद्ध लुंगी डान्स गाण्यावर थिरकताना दिसला. याच वेळी व्हिडिओ टिपला गेला आणि तो बघता-बघता व्हायरल सुद्धा झाला. पाहा या व्हिडिओची झलक.

 

 

 

 

या व्हिडिओमध्ये शाहरुखसोबत डी जे ब्रावो दिसतोच तसेच तिथे इतर क्रिकेटपटू हजर आहेत याचा अंदाज पण येतो. या व्हिडिओला ऑडिओ नाही आहे पण तरी पूर्ण व्हिडिओ नीट पाहिला तर व्हिडिओच्या अगदी शेवटाकडे बॅकग्राऊंडला लुंगी डान्स गाणं ऐकायला मिळतं. शाहरुख यामध्ये ब्रावोला या गाण्याचे सिग्नेचर स्टेप्स शिकवताना दिसतो. तर या क्यूट व्हिडिओमध्ये ब्रावोसुद्धा त्याच्या पद्धतीत ते शिकत छान धमाल करत त्याचे स्टेप्ससुद्धा टाकताना दिसून येतो. या दोघांच्या या लुंगी डान्सने इंटरनेटवर वेगळीच धमाल गाजत आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#40SHADESOFGAYLE September 20th ?? @iamsrk #NuffRespect ??

A post shared by KingGayle (@chrisgayle333) on

 

याच लीगमधला एजून एक व्हिडिओ सुद्धा सध्या व्हायरल झाला आहे आणि त्यात सुद्धा सगळ्यांचा लाडका किंग खान दिसून येतो. या व्हिडिओमध्ये शाहरुख त्याच्या टीमच्या विजयाचा आनंद व्यक्त करताना दिसतो. शाहरुखची टीम जिंकताच, त्याच्या टीममधल्या क्रिकेटपटू क्रिस गेलला शाहरुख धावत जाऊन मिठी मारताना या व्हिडिओमध्ये दिसतो. खुद्द क्रिसने शाहरुखसोबतचा या वेळचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्याच्या या फोटोला त्याने ‘नफ रिस्पेक्ट’ असं कॅप्शन दिलं आहे, ज्याचा अर्थ आहे खूप आदर असा होतो. शाहरुखला अशी धमाल करताना पाहून त्याच्या चाहत्यांना नक्कीच आनंद होणार आहे. अशातंच शाहरुखच्या आगामी सिनेमाची चर्चा सुरुच आहे. नुकताच तो अली अब्बास झफरचा पुढचा सिनेमा करत आहे अशी चर्चा रंगली होती पण त्यावर खुद्द शाहरुखने स्पष्टीकरण देत तो सध्या कोणताही सिनेमा करत नसल्याचं उघड केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...