Khuda Haafiz 2 Trailer: विद्युत जामवालच्या 'खुदा हाफिज 2'चा ट्रेलर रिलीज, अॅक्शन-इमोशनचा दिसतोय उत्तम मेळ

बी टाऊन
भरत जाधव
Updated Jun 08, 2022 | 15:05 IST

आपल्या जबरदस्त अ‍ॅक्शनने (Action) लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करणारा अभिनेता (Actor) विद्युत जामवालच्या (Vidyut Jamwal) 'खुदा हाफिज चॅप्टर २ अग्निपरीक्षा'  (Khuda Hafiz Chapter 2) चा ट्रेलर (Trailer) रिलीज झाला आहे. हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट 2020 मध्ये रिलीज झालेल्या 'खुदा हाफिज'चा सिक्वेल आहे.

Trailer release of Vidyut Jamwal's 'Khuda Hafeez 2'
विद्युत जामवालच्या 'खुदा हाफिज 2'चा ट्रेलर रिलीज  |  फोटो सौजन्य: YouTube
थोडं पण कामाचं
  • निर्मात्यांनी ट्रेलरमध्ये रोमान्स, ड्रामा आणि अॅक्शनचा जबरदस्त समावेश केला आहे.
  • चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात एका चित्तथरारक संवादाने होते.
  • 2020 मध्ये रिलीज झालेल्या 'खुदा हाफिज'चा सिक्वेल आहे खुदा हाफिज 2 - अग्निपरीक्षा

Khuda Haafiz 2 Trailer:  मुंबई :  आपल्या जबरदस्त अ‍ॅक्शनने (Action) लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करणारा अभिनेता (Actor) विद्युत जामवालच्या (Vidyut Jamwal) 'खुदा हाफिज चॅप्टर २ अग्निपरीक्षा'  (Khuda Hafiz Chapter 2) चा ट्रेलर (Trailer) रिलीज झाला आहे. हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट 2020 मध्ये रिलीज झालेल्या 'खुदा हाफिज'चा सिक्वेल आहे. या ट्रेलरमधील विद्युतची अॅक्शन पहिल्या चित्रपटासारखीच आहे. निर्मात्यांनी ट्रेलरमध्ये रोमान्स, ड्रामा आणि अॅक्शनचा जबरदस्त समावेश केला आहे, जो लोकांना आकर्षित करत आहे.

दरम्यान या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात एका चित्तथरारक संवादाने होते, त्यानंतर ट्रेलर संपूर्ण फॅमिली आणि अॅक्शन सीक्वेन्ससह दिसतो. ज्यामध्ये विद्युत आपली मुलगी नंदनीच्या शोधात देश-विदेशात भटकत आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा सिनेमा 2020 मध्ये रिलीज झालेल्या 'खुदा हाफिज'चा सिक्वेल आहे. या चित्रपटातील पात्र समीर आणि नर्गिसची कथा पुढे सरकलेली दाखवण्यात आली आहे. नर्गिसला देशात परत आणल्यानंतर समीर म्हणजेच विद्युत तिला पुन्हा सामान्य जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करताना दिसतो.

यात समीर नर्गिसला परत साधरण जीवन मिळवून देण्यासाठी एका मुलीला दत्तक घेतो.. आणि तिघेही पुन्हा एकदा एकत्र आयुष्याला सुरुवात करतात. पण यावेळीही समीरच्या सुखी आयुष्यावर वाईट नजर पडते. एके दिवशी काही लोक त्यांची मुलगी नंदिनीचे शाळेतून अपहरण करतात. यानंतर वडिलांचा संघर्ष सुरू होतो. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भावना आणि अॅक्शन दोन्ही दिसत आहेत आणि प्रेक्षकांना कथेशी जोडण्यात दिग्दर्शक यशस्वी होतील असा अंदाज आहे.

 या चित्रपटाबद्दल विद्युत जामवाल म्हणतो, "मी प्रेक्षक आणि चाहत्यांचा खूप आभारी आहे, ज्यांनी मी साकारलेल्या प्रत्येक पात्राला प्रेम दिले. समीरला भरभरून प्रेम दिल्याबद्दल मी त्याचे तितके आभार मानू  ते कमीच आहेत. ” 8 जुलैला मी आपल्याला चित्रपटगृहात समीरच्या रुपात दिसेल. जो प्रेमाचे प्रतीक आहे. चित्रपटगृहात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात इतका आनंद कुठेच नाही.'' 

त्याचवेळी नर्गिसच्या भूमिकेत दिसणारी शिवलिका ओबेरॉय म्हणते, “खुदा हाफिजसोबत, आम्ही (विद्युत आणि मी) प्रेक्षकांना त्यांच्या डिजिटल स्क्रीनवर समीर आणि नर्गिसच्या रूपात भेटलो आणि आता आम्ही सर्वजण दुसरा अध्यायात आम्ही यावेळी ८ जुलै रोजी सिनेमागृहात भेटणार आहोत. पहिल्या चित्रपटाच्या हॅपी एंडिंगनंतर काय होतं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर हा चित्रपट तुमच्यासाठी नक्कीच आहे.” अॅक्शन आणि इमोशनने भरलेल्या या 2 मिनिट 24 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये विद्युत जमावाल जबरदस्त अॅक्शनमध्ये आपल्या कुटुंबासाठी लढताना दिसत आहे. पॅनोरमा स्टुडिओच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर हा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

विद्युत जामवालचा हा चित्रपट आता पुढील महिन्यात ८ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. खुदा हाफिज 2 ची नवीन रिलीज डेट टीझर व्हिडिओ शेअर करून जाहीर करण्यात आली आहे. या टीझर व्हिडिओमध्ये अभिनेता विद्युत जामवाल मुसळधार पावसात अॅक्शन करताना दिसत आहे. यापूर्वी हा चित्रपट 17 जून रोजी सिनेगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. दरम्यान या अॅक्शन ड्रामा चित्रपटात विद्युत जामवाल सोबत शिवालिका ओबेरॉय देखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फारुख कबीर यांनी केले आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी