Vijay and Rashmika Relationship : रश्मिका मंदान्नासोबत रिलेशनशिपमध्ये?, स्वतः विजय देवरकोंडानं केला मोठा खुलासा

बी टाऊन
Updated Jul 29, 2022 | 15:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vijay Deverakonda clarifies relationship Status: विजय देवरकोंडाने कॉफी विथ करणच्या सीझन 7 मध्ये हजेरी लावली आहे. करण जोहरच्या या शोमध्ये विजय देवरकोंडाने त्याच्या वैयक्तिक आयु्ष्यातील काही गोष्टींवरही खुलासा केला आहे.

Vijay Deverakonda clarifies relationship
विजय देवरकोडा आणि रश्मिका मंदाना रिलेशनशिपमध्ये?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या सीझन 7 मध्ये विजय देवरकोंडा दिसणार आहे.
  • या शोमध्ये अनन्या पांडेसोबत विजय देवरकोंडा दिसणार आहे.
  • शोमध्ये विजयने त्याच्या लव्ह लाईफबद्दलही खुलासा केला आहे.

Vijay Deverakonda clarifies relationship: विजय देवरकोंडा आता 'कॉफी विथ करण' मध्ये हजेरी लावली. विजय देवरकोंडाने करण जोहरच्या प्रसिद्ध शोमध्ये हजेरी लावली . अभिनेता 'कॉफी विथ करण' सीझन 7 मध्ये त्याची 'लायगर' सिनेमातील सह-कलाकार अनन्या पांडेसोबत दिसणार आहे. शोमध्ये करण जोहरने विजयला त्याच्या लव्ह लाईफबद्दलही विचारणा केली. संभाषणाच्या सुरुवातीलाच विजय म्हणाला, 'तुला काहीही कळू नये अशी माझी इच्छा आहे.'


करण जोहरने विजय देवरकोंडाला त्याच्या लव्ह लाईफबद्दलही विचारणा केली त्यांच्या नात्याबद्दल बोलताना विजय म्हणाला, “मी माझ्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात तिच्यासोबत दोन चित्रपट केले आहेत. रश्मिका सुंदर आहे आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो. ती खरोखर एक चांगली मैत्रीण आहे. तुम्ही सिनेमाद्वारे खूप काही शेअर करता, यावेळी अनेक चढ-उतार येतात, तुमचं बाँडिंग बनतं चागलं, तुम्ही इतक्या लवकर जवळ येता की तुमचे बंध खूप लवकर विकसित होतात. मात्र, मला या सगळ्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो." असंही विजय देवकोंडाने यावेळी स्पष्ट केले. 

अधिक वाचा : कार्तिकच्या नावाने चिडवणाऱ्या फॅन्सशी विजयने केली हाणामारी


करण जोहरने शेवटी विजयला शोमध्ये विचारले की त्याचं स्टेटस काय आहे 'सिंगल की कॉम्प्लिकेटेड'? यावर अभिनेत्याने अगदी मजेत उत्तर दिले, 'एखाद्या दिवशी मी लग्न करेन आणि मला मुलेही होतील. मी त्या दिवशी मोठ्याने सांगेन. पण तोपर्यंत माझ्यावर प्रेम करणाऱ्या कुणालाही दुखवायचे नाही.मला खात्री आहे की एक अभिनेता म्हणून तुमच्यावर प्रेम करणारे बरेच लोक आहेत. त्यांच्या भिंतींवर तुमचे पोस्टर, फोन, वॉलपेपर आहे, मला त्यांना दुखवायचे नाही. ते मला इतकं प्रेम देत आहेत की मी कुणासोबत आहे हे मला सांगायचे नाही.'
 

Rashmika Mandanna denies dating rumours with Vijay Deverakonda | Telugu Movie News - Times of India

अधिक वाचा : ठाकरेंनी राजीनामा दिलेल्या जागेवर शिंदे गटाचा उमेदवार ठरला?

कॉफी विथ करणच्या सीझन 7मध्ये अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांनी हजेरी लावली. यावेळी अनन्या आणि विजयने त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप गोष्टी स्पष्टपणे मांडल्या. काही गोष्टीचा खुलासा केला.  येत्या 25 ऑगस्टला लायगर हा सिनेमा रिलीज होत आहे. अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. सध्या दोघंही या सिनेमाच्या  प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी