Vijay Verma and Tamannaah Bhatia: अभिनेता विजय वर्मा (Vijay Verma) आणि तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) यांच्या रिलेशनशिपची चर्चा काही वेळा पासून होत आहे. आता व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी विजयने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रेमाची कबूली दिली आहे. विजय वर्माने आपल्या इन्स्टा स्टोरीवर तमन्ना भाटियाबरोबर रिलेशनशिपला घेऊन खूप मोठा इशारा दिला आहे. विजय वर्माची ही खास स्टोरी आता वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विजय वर्माने इस्टाग्रामवर व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये त्याने आपल्या पायाचा फोटो शेअर केला आहे, तर दुसरीकडे एका मुलीचे पाय दिसत आहेत. या फोटोला पाहिल्यानंतर चाहत्यांना असं वाटतं आहे की, फोटोमध्ये दुसरी कोणती मुलगी नाही तर त्याची रूमर्ड गर्लफ्रेंड तमन्ना भाटिया आहे. एक नजर टाकूया या फोटोकडे.
नववर्षाच्या सेलिब्रेशनच्या निमित्ताने विजय वर्मा आणि तमन्ना भाटियाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये दोघेही एकमेकांना किस करताना दिसत आहेत. यानंतर दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले आहेत. मात्र अद्यापही तमन्ना आणि विजय या दोघांनीही त्यांच्या रिलेशनशिप संदर्भात काही स्पष्ट केले नाही. दरम्यान, व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने विजय वर्माची ही इन्स्टाग्राम स्टोरी थेट तमन्नासोबतच्या त्याच्या नात्याकडे बोट दाखवत आहे. यावर चाहत्यांच्या मजेदार प्रतिक्रियाही समोर येत आहेत.
या इन्स्टाग्राम स्टोरीला पाहून काही चाहत्यांचे खूप मजेशीर रिएक्शन समोर येत आहेत. काही सोशल मीडिया यूजर्सच असं मानतात की, जगासमोर प्रेम कधीच लपत नाही. लवकरच दोघेही एकत्र प्रेमाची कबुली देतील.