तापसी पन्नू, अनुराग कश्यप, विकास बहल घरी इन्कम टॅक्सचे छापे

कश्यपच्या प्रॉडक्शन हाऊस फॅंटम फिल्म्सच्या संदर्भात  संपत्तीचा शोध घेण्यात आले आहेत.

vikas bahl anurag kashyap taapsee pannu income tax search phantom films mumbai
तापसी पन्नू, अनुराग कश्यप, विकास बहल घरी इन्कम टॅक्सचे छापे 

मुंबई : आयकर विभागाने बुधवारी कश्यपच्या प्रॉडक्शन हाऊस फॅंटम फिल्म्सच्या संदर्भात चित्रपट निर्माते अनुराग कश्यप, विकास बहल आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरांमध्ये छापा टाकला आहे.  विभागाने मुंबईतील तापसी पन्नू, अनुराग कश्यप आणि फॅंटम फिल्म्सशी संबंधी तीन जागांवर शोध मोहिम केली आहे. मधू मॉन्टेना यांच्या घरी छापा टाकला. 

साधारण २२ ठिकाणी हे धाडसत्र सुरू आहे. फॅन्टम फिल्ममध्ये मधु मॉन्टेना यांच्या भाग आहे. विवरण पत्रात दिलेल्या संपत्ती पेक्षा अधिक संपत्ती असल्याचा तसेच विवरण पत्रात खोटी माहिती दिल्यामुळे चौकशी करण्यासाठी हा छापा सत्र सुरू आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

तापसीने नुकतेच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जाहीर केले होते की ती फॅन्टम फिल्मच्या दोबारा या चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटात ती थप्पड चित्रपटातील सहकलाकार  पावेल गुलाटी सोबत काम करणार आहे. ३३ वर्षीय या अभिनेत्रीने थप्पड चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक पोस्ट केली होती. त्यात तिने ही माहिती दिली आहे. 

'दोबारा' या माध्यमातून अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू हे एकत्र तिसऱ्यांदा काम करत आहे.  यापूर्वी दोघे 2018 चा हिट चित्रपट 'मनमर्जियां' आणि 'सांड की आंख' यात काम केले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी