Vikram Gokhale: विक्रम गोखले यांच्या निधनाचं वृत्त खोटं; प्रकृती मात्र चिंताजनक

बी टाऊन
भरत जाधव
Updated Nov 24, 2022 | 09:09 IST

काल रात्री विक्रम गोखले यांच्या मुलीनं ANI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, 'ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर असून ते लाइफ सपोर्टवर आहेत.  त्याच्यासाठी प्रार्थना करत राहा.'

The news of Vikram Gokhale's death is false, but his condition is critical
विक्रम गोखले यांच्या निधनाचं वृत्त खोटं, पण प्रकृती चिंताजनक  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • विक्रम गोखले हे 5 नोव्हेंबरपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल
  • विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
  • विक्रम गोखले यांनी विविध नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले.

पुणे: ज्येष्ठ अभिनेते (Veteran actor) विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचा मृत्यू झाल्याची बातमी माध्यमांनावर प्रसारित केली जात होती. परंतु ही बातमी खोटी असल्याचं विक्रम गोखले यांची पत्नी वृषाली यांनी म्हटलं आहे. विक्रम गोखले हे जिवंत असले तरी त्यांची  प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती दीनानाथ रुग्णालयाकडून  (Dinanath Hospital) देण्यात आली आहे. (Vikram Gokhale's death news is false; but he is critical- deenanath mangeshkar hospital)

अधिक वाचा  : Vastu Tips:घराच्या बाथरूममध्ये चुकूनही ठेवू नका ही रोपे

काल रात्री विक्रम गोखले यांच्या मुलीनं ANI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, 'ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर असून ते लाइफ सपोर्टवर आहेत.  त्याच्यासाठी प्रार्थना करत राहा.' विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनी माध्यमांना विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या,'ते काल कोमामध्ये गेले होते. त्यानंतर त्यांनी काहीही रिस्पॉन्स दिलेला नाही.

अधिक वाचा  : Ullu Appवर आहेत अशा काही वेबसिरीज ज्या एकट्यानेच पाहू शकतात

विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वृषाली यांनी सांगितलं की, 'विक्रम गोखले यांच्यावर 5 नोव्हेंबरपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची तब्येत थोडी बरी झाली होती पण पुन्हा त्यांची तब्येत खालावली. त्यांना हृदय आणि किडनी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.'  “त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र आता पुन्हा ती बिघडली. हृदय आणि किडनीशी संबंधित समस्या त्यांना जाणवत आहेत. त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्याची माहिती डॉक्टरांनी आम्हाला दिली असल्याचं ”, असं वृषाली गोखले यांनी सांगितले.

अधिक वाचा  : तरुणाचं अपहरण करुन 4 तरुणींनी केला सामूहिक बलात्कार 

दरम्यान विक्रम गोखले यांची एक मुलगी परदेशी राहते. ती सॅन फ्रान्सिस्कोहून पुण्याला परतली आहे. तर दुसरी मुलगीही सध्या पुण्यातच आहे.  तर 30 ऑक्टोबरला विक्रम गोखले यांनी त्यांचा 82 वा वाढदिवस साजरा केला होता. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गोदावरी या चित्रपटामध्ये देखील विक्रम गोखले यांनी महत्वाची भूमिका साकारली. या चित्रपटामध्ये विक्रम जोशी यांच्याबरोबरच जितेंद्र जोशी, अभिनेत्री गौरी नलावडे, अभिनेता संजय मोन यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. विक्रम गोखले यांनी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि चित्रपट अशा सर्व व्यासपीठांवर आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

विक्रम गोखले यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही नाव कमावले आहे. अग्निपध, अकेला, ईश्वर, हम दिल दे चुके सनम, घर आया मेरा परदेसी या हिट हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे. तर नटसम्राट, माहेरची साडी, लपंडाव , वजीर हे त्यांचे मराठी चित्रपटातील त्यांच्या भूमिकांनी लोकांच्या मनात ठसा उमटवला आहे. दरम्यान रंगभूमीवर त्यांनी एक मोठा काळ गाजवला आहे. 2016 मध्ये त्यांनी घशाच्या त्रासामुळे नाटकातून संन्यास घेतला होता. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी