Vikram Vedha Teaser out : साऊथच्या सिनेमांना टक्कर देणाऱ्या हृतिक-सैफच्या 'या' सिनेमाचा Teaser out

बी टाऊन
Updated Aug 24, 2022 | 14:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vikram Vedha teaser out : बहुप्रतिक्षीत अशा विक्रम-वेधा (Vikram Vedha ) या सिनेमाचा टीझर अखेर रिलीज झाला आहे. हृतिक रोशन (Hrithik Roshan ), सैफ अली खानचा (Saif ali khan )हा चित्रपट साऊथच्या सिनेमांच्या या खडतर स्पर्धेमध्ये बॉलिवूडचा तारणहार ठरू शकतो. येत्या 30 सप्टेंबरला हा बहुप्रतीक्षित सिनेमा वर्ल्डवाईड रिलीज होणार आहे.

Vikram vedha teaser out hrithik roshan saif ali khan lead role dont miss
हृतिक-सैफच्या बहुप्रतीक्षित सिनेमाचा Teaser out  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • विक्रम वेधचा टीझर अखेर रिलीज करण्यात आला आहे.
  • या सिनेमात हृतिक रोशन, सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
  • विक्रम वेधा 30 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे.

Vikram Vedha teaser out : हृतिक रोशन (Hrithik Roshan ) आणि सैफ अली खानचे (Saif ali khan ) चाहते ज्या दिवसाची वाट पाहत होते, 
तो दिवस अखेर आला आहे! बहुप्रतीक्षित विक्रम वेधाचा (Vikram Vedha) टीझर अखेर रिलीज झाला आहे. फेस-ऑफ, अॅक्शन सीक्वेन्स आणि संवादांनी भारलेला, 
विक्रम वेधा (Vikram Vedha) बॉलिवूडसाठी साऊथ फिल्म इंडस्ट्रीच्या कठीण स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी वरदान ठरू शकतो.


"अच्छे और बुरे के बीच चुनना बहुत आसान होता हे सर, ये कहानी मै तो दोनो बुरे है... " हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका असलेला  1 मिनिट 46 सेकंदांचा टीझर तुम्हाला विक्रम वेधाच्या जगात घेऊन जातो. संवाद,अॅक्शन सीक्वेन्स आणि इमोशनल ड्रामा, कॅची बॅकराऊंड म्युझिक, सिनेमातील प्रत्येक गोष्ट तुमची 30 सप्टेंबरपर्यंतची उत्सुकता ताणून धरणारी आहे. 

अधिक वाचा : नात्यांमध्ये ‘भूतकाळा’चं संकट आलं तर?

वेधाच्या भूमिकेत असलेल्या हृतिकने सिनेमाचा टीझर शेअर करत, लिहिले, "एक कहानी सुनाये? #VikramVedhaTeaser OUT NOW https://bit.ly/VikramVedha-Teaser #VikramVedha 30 सप्टेंबर 2022 रोजी जगभरातील थिएटरमध्ये रिलीज होत आहे. #SaifAliKhan @PushkarGayatri (sic)."


विक्रम वेधा हा पुष्कर-गायत्री यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला अ‍ॅक्शन-थ्रिलर आहे. विक्रम वेधा सिनेमात अनेक ट्विस्ट आणि टर्न्स आहेत. पोलीस विक्रम (सैफ अली खान) वेधा (हृतिक रोशन) या भयानक गुंडाचा माग काढण्यासाठी आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी निघतो. उंदारा-मांजराचा खेळ सुरु होतो. 

अग्निपथनंतर (Agnipath ) पुन्हा एकदा हृतिक रोशन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. टीझर लॉन्च दरम्यान हृतिकने सांगितले की मूळ चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना ही भूमिका खूपच आवडली होती. हृतिक रोशनने वेधाची भूमिका अचूक टिपली आहे.

मंगळवारी टीझरचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते, जिथे चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. हृतिक आणि सैफची ही जुगलबंदी पाहण्यासारखी आहे. समीक्षकांनीही सिनेमाच्या टीझरचं खूप कौतुक केलेलं आहे. हृतिक-सैफच्या कामाचंही कौतुक होताना दिसत आहे. ज्याच्या त्याच्या तोंडी "छा गए हृतिक-सैफ" हेच 
ऐकायला येत आहे. प्रेक्षकांनीही सिनेमाच्या टीझरला चांगला प्रतिसाद दिलेला आहे.

अधिक वाचा: मराठी सिनेमा वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या दिग्दर्शकाचा वाढदिवस

सैफ आणि हृतिकशिवाय या सिनेमात राधिका आपटे, रोहित सराफ आणि योगिता बिहानी यांच्याही भूमिका आहेत. मूळ सिनेमात अभिनेते आर माधवन (R madhvan ) आणि विजय सेतुपती ( vijay sethupathi) मुख्य भूमिकेत होते. विक्रम वेधा हा सिनेमा गुलशन कुमार, टी-सीरीज आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांनी फ्रायडे फिल्मवर्क्स, जिओ स्टुडिओ आणि YNOT स्टुडिओ प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने सादर केलेला आहे. हा सिनेमा पुष्कर आणि गायत्री यांनी दिग्दर्शित केला आहे आणि भूषण कुमार आणि एस.शशिकांत निर्मित विक्रम हा सिनेमा 30 सप्टेंबर 2022 रोजी वर्ल्डवाईड रिलीज होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी