Virushka Net worth: 1,200 कोटींहून अधिक संपत्तीचे मालक विराट-अनुष्का? गुरुग्रामपासून थेट मुंबईपर्यंत?

बी टाऊन
Updated Dec 11, 2021 | 15:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

Virushka Wedding Anniversary: ​​टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाह चार वर्षांपूर्वी याच दिवशी झाला होता. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने जाणून घ्या विरुष्काकडे एकूण किती संपत्ती आहे.

Virat-Anushka owns assets worth over Rs 1,200 crore?
विरुष्काकडे 1200 कोटींची संपत्ती, जाणून घ्या एकूण संपत्ती  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • विराट-अनुष्का बॉलिवूडमधील प्रतिष्ठित सेलिब्रिटी कपल
  • विराट-अनुष्का 1200 कोटींहून अधिक संपत्तीचे मालक?
  • एका सिनेमासाठी अनुष्का 12 ते 15 कोटी रुपये घेते


Virushka Wedding Anniversary: ​​टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाह चार वर्षांपूर्वी याच दिवशी झाला होता. दोघांनी 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीमध्ये जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केले आणि त्यानंतर भारतात दोघांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये भव्य रिसेप्शन दिले. अनेक सेलिब्रिटींनी या रिसेप्शनला हजेरी लावली होती. आता या सेलिब्रिटी जोडप्याच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. आता हे दोघेही एका मुलीचे आई-वडील झाले आहेत.

Virat Kohli says welcoming his daughter Vamika with wife Anushka Sharma has been the greatest moment of his life | Hindi Movie News - Times of India


एका टीव्ही जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान दोघांची भेट झाली. यानंतर दोघांनी बरेच दिवस डेट केले आणि नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. याआधी आणि आजही विराट कोहलीने अनेकदा सांगितले आहे की, अनुष्का आयुष्यात आल्यानंतर त्याचे आयुष्य खूप चांगले झाले आहे. विरुष्का नावाने प्रसिद्ध असलेली विराट-अनुष्काची जोडी कमाईच्या बाबतीतही खूप पुढे आहे. कोहली आणि अनुष्काची नावे क्रिकेट आणि बॉलीवूडमधील सर्वात प्रतिष्ठित सेलिब्रिटींमध्ये आहेत.


निव्वळ संपत्ती

विराट आणि अनुष्का हे देशातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींपैकी एक आहेत. 2019 च्या फोर्ब्स सेलिब्रिटींच्या 100 लोकांच्या यादीत विराटने पहिले स्थान मिळवले होते तर अनुष्का शर्मा 21 व्या स्थानावर होती. GQ इंडिया मॅगझिननुसार, विराट कोहलीची एकूण संपत्ती जवळपास 900 कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर अनुष्का शर्माची संपत्ती 350 कोटींच्या आसपास आहे. कोहली आणि अनुष्का यांची एकत्रित मालमत्ता 1,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.


सिनेमाचे मानधन

अनुष्का शर्मा एका सिनेमासाठी 12-15 कोटी रुपये घेते. आतापर्यंत तिने जवळपास 19 चित्रपट केले आहेत. त्यांचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे, जे 2014 मध्ये भावासोबत सुरू केले. मान्यावर, मिंत्रा, निव्हिया, रजनीगंधा, श्याम स्टील, कॉक्स अँड किंग्स, पँटेन, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, गुगल पिक्सेल आणि बरेच काही ब्रँड्सच्या जाहिराती अनुष्काकडे आहेत.  या बॉलिवूड अभिनेत्रीचा स्वतःचा फॅशन ब्रँड नुश देखील आहे.

विरूष्काचे घर

रिअल इस्टेटमध्ये हात आजमावत असताना विरुष्काने खूप महागडे घर घेतले आहे. 2017 मध्ये लग्नानंतर दोघेही मुंबईतील वरळी येथील शाही घरात शिफ्ट झाले. त्यांच्या घराची किंमत जवळपास 34 कोटी आहे. कोहली आणि अनुष्काने गुरुग्राममध्ये सुमारे 80 कोटींची प्रॉपर्टी खरेदी केल्याचेही वृत्त आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी