Virat kohali birthday : विराट कोहलीच्या वाढदिवसाला अनुष्काचं खास गिफ्ट, शेअर केले विराटचे unseen photos

बी टाऊन
Updated Nov 05, 2022 | 14:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

Virat kohali birthday : विराट कोहली (Virat Kohali) आज त्याचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. उद्याच्या झिम्बाब्वे विरुद्धच्या मॅचसाठी तो तयारी करतो. यावेळी त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे unseen फोटोज शेअर केले आहेत.

 Anushka sharma share Virat kohali's unseen photos on social media
विराटच्या वाढदिवसाला अनुष्काचं खास गिफ्ट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • विराटच्या वाढदिवसाला अनुष्काचं खास गिफ्ट
  • अनुष्काने इंस्टावर शेअर केले विराटचे unseen photos
  • अनुष्काच्या पोस्टवर चाहत्यांचा कमेंट्सचा वर्षाव

Virat kohali birthday :  विराट कोहली (Virat Kohali) आज त्याचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या विराट फॉर्ममध्ये आहे आणि त्याचा हा फॉर्म पाहता तो रोजच वाढदिवस साजरा करत असेल हे वेगळं सांगायला नको. विराटचे चाहते आणि त्याचे हितचिंतक त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षावर करत आहेत. त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माही (Anushka Sharma) यात मागे नाही. अनुष्कानेही विराटच्या वाढदिवसानिमित्त एक खास गिफ्ट त्याला दिलं आहे. अनुष्काने विराटचे unseen photos सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Virat kohali birthday Anushka sharma share Virat kohali's unseen photos on social media)

अधिक वाचा : 'द केरला स्टोरी'चा टीझर आऊट

विशेष म्हणजे, अनुष्का नेहमीच सोशल मीडियावर तिचे आवडते फोटो इन्ट्रेस्टिंग कॅप्शनसह पोस्ट करत असते. यावेळीही तिने विराटच्या वाढदिवसानिमित्त त्याचे काही मजेदार आणि unseen फोटोज शेअर करण्याचे ठरवले आणि ते फोटो शेअर केलेसुद्धा.

अनुष्काने या फोटोजना कॅप्शन दिले, "हा तुझा वाढदिवस आहे, त्यामुळे साहजिकच, मी या पोस्टसाठी तुझे सर्वोत्कृष्ट फोटो निवडलेले आहेत. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि कायम राहील" शेअर केलेल्या फोटोंमध्ये विराटने वामिकाला हातात धरलेले आहे. त्यामुळे हा शेवटचा फोटो विराट आणि अनुष्काचा सगळ्यात आवडता फोटो आहे. 

अधिक वाचा : फक्त पाणी पिऊनही कमी होतं वजन

विराट कोहलीनेसुद्धा अनुष्काच्या या पोस्टवर कमेंट केलेली आहे. काही हार्ट इमोजी आणि laughing इमोजीसह विराटने कमेंट केलेली आहे. दरम्यान, विराट टी-20 वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या पुढच्या मॅचसाठी तयार करत आहे. झिम्बाब्वेविरुद्ध पुढचा सामना रविवारी रंगणार आहे त्यासाठीविराट तयारी करत आहे. आतापर्यंतचा विराटचा फॉर्म पाहता त्याच्याकडून या मॅचमध्येही मोठी अपेक्षा केली जात आहे. विराटचा वैयक्तिक खेळही सध्या उंचावलेला आहे. त्यामुळे यापुढेही त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा करण्यात येत आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी