'...यामुळे अनुष्काला कधीही प्रपोज केलं नाही', विराट कोहलीचा खुलासा

Virat Kohli Anushka Sharma: फुटबॉलपटू सुनील छेत्रीसोबत लाइव्ह चर्चा करताना क्रिकेट विराट कोहली अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. 

virat kohli disclose for this reason never proposed to anushka sharma
'...यामुळे अनुष्काला कधीही प्रपोज केलं नाही', विराट कोहलीचा खुलासा  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • फुटबॉलपटू सुनील छेत्रीसोबत विराट कोहली लाइव्ह
  • विराटने आपल्या रिलेशनशिप आणि अनुष्काच्या प्रेमकथेशी संबंधित केले अनेक खुलासे
  • विराट कोहली म्हणाला की, त्याने अनुष्का शर्माला कधीही प्रपोज केले नाही

मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे बॉलीवूड आणि क्रिकेट जगतातील सर्वात आवडते जोडपे आहे. लॉकडाऊनमध्ये दोघे बराच वेळ एकत्र घालवत आहेत. या काळात हे जोडपे सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. आता विराट एका लाइव्ह दरम्यान, सांगितलं आहे की, त्याने अनुष्काला कधीही प्रपोज का केलं नाही ते.

विराट कोहली फुटबॉलपटू सुनील छेत्रीसोबत लाइव्ह होता. या लाइव्ह व्हिडिओमध्ये विराट कोहलीने सुनीलच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्याने आपल्या रिलेशनशिप आणि अनुष्काच्या प्रेमकथेशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत.
 
विराट कोहली म्हणाला की, त्याने अनुष्का शर्माला कधीही प्रपोज केले नाही. विराट म्हणतो की, आमच्या रिलेशनशीपमध्ये प्रत्येक गोष्ट आपोआप होऊ लागली होती. आम्हाला नेहमीच माहित होतं की, आम्ही लग्न करणार आहोत.

सुनील छेत्रीने विराट कोहलीला विचारले की, त्यांने अनुष्काला कधीच प्रपोज का केलं नाही? त्यावर  विराट कोहली म्हणाला, 'माझा असा विश्वास आहे की,  तुम्ही आयुष्यात खुलेपणाने जगलात आणि प्रेम केले तर कोणताही स्पेशल दिवस नसतो.' 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

You my love bring light into this world. And you light up my world everyday. I love you ❤️

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

'ना व्हॅलेंटाईन डे किंवा इतर काहीही असत. कारण माझ्यासाठी दररोज व्हॅलेंटाईन डे असतो. अनुष्काने जे सांगितले ते अगदी बरोबर होते. आम्ही लग्न करणार आहोत याबद्दल आम्हाला कधीच शंका नव्हती.' असं विराट म्हणाला होता. 

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी ११ डिसेंबर २०१७ रोजी इटलीमध्ये लग्न केले होते. वर्कफ्रंटबद्दल विचार केल्यास, अनुष्का शर्मा निर्मित वेब सीरिज पाताल लोक रिलीज झाली आहे. विराटने सोशल मीडियावर त्याचे कौतुकही केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी