वीरू देवगण यांच्या आठवणींना उजाळा, 14 वर्षांच्या वयात घरातून पळून मुंबईत आले अन् थेट तुरूंगात पोहोचले

बी टाऊन
Updated May 27, 2019 | 19:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Viru Devgan Passes away: वीरू देवगण यांनी स्टंट दिग्दर्शक म्हणून प्रसिद्धी आणि लोकप्रियता तर मिळवली पण नावारूपास येण्याआधीचा त्यांचा प्रवास खडतर होता. त्यांच्या स्ट्रगलच्या दिवसातले अनेक किस्से आहेत.

Viru Devgan ran away at 14 years age went to jail
वीरु देवगण यांच्या आठवणींना उजाळा, 14 वर्षांच्या वयात घरातून पळून मुंबईत आले आणि थेट तुरुंगात पोहोचले 

मुंबई: प्रसिद्ध स्टंट दिग्दर्शक म्हणून लोकप्रियता कमावलेले वीरू देवगण यांचं वयाच्या 76व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. अजय देवगण यांचे वडील असलेले वीरू देवगण यांनी अनेक सिनेमांतून आपल्या स्टंटची कमाल दाखवली होती. लोकप्रियता आणि प्रसिद्धी पाहिलेल्या या स्टंट दिग्दर्शकाचा प्रवास मात्र तेवढा सोपा निश्चितंच नव्हता. बॉलिवूडमध्ये नावारूपाला यायच्या आधी त्यांनी बरेच स्ट्रगल पाहिलं होतं. त्यातही सुरूवातीच्या काळात तर थेट तुरूंगात ही जायची वेळ त्यांच्यावर ओढवली होती. आज त्यांच्या या काही आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देत त्यावर एक नजर टाकूयात.

 

 

 

 

वीरू देवगण हे स्टंट दिग्दर्शक म्हणून नावारूपास आले असले तरी त्यांना बॉलिवूची स्वप्न पडत होती ती हिरो म्हणूनच. त्यांना या ग्लॅमरस दुनियेत हिरो व्हायचं होतं आणि हाच ध्यास घेऊन अवघ्या 14 वर्षांचे वीरू देवगण अमृतसरवरून पळून दिल्लीत पोहचले. दिल्लीवरून पुढे मुंबईचा पल्ला गाठायचा होता पण या 14 वर्षाच्या मुलाकडे तेव्हा तेवढे पैसे नव्हते. अखेर फ्रंटियर मेलमधून त्यांचा मुंबईकडचा प्रवास सुरू तर झाला. पण तिकीट नसलेल्या वीरू यांना मुंबईत येताच विरार स्टेशनवर पकडलं गेलं. त्यांच्याकडे तिकीट नव्हती म्हणून पोलिस स्टेशनला नेण्यात आलं तिथून पुढे मॅगीस्ट्रेटच्या समोर त्यांना नेलं गेलं. पण त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे फाईन भरणं त्यांना शक्य नव्हतं म्हणून अखेर त्यांना तुरूंगवास झाला. त्यामुळे करिअर सुरू करायला आलेल्या या 14 वर्षांच्या लहानग्यानं अगदी पहिल्या दिवशीच स्ट्रगल फारच जवळून अनुभवला.

 

सुतार म्हणून सुद्धा काम केलं

एवढंच काय तर पुढे मुंबईत स्ट्रगल करताना सुतार काम करण्याची वेळ सुद्धा त्यांच्यावर आली होती. शिवाय अनेकदा गाड्या साफ करून आपलं पोट भरावं लागलं होतं त्यांना. या दरम्यान त्यांचा स्ट्रगल मात्र सुरू होता. रोज अनेक फिल्म स्टुडिओजला भेट देत त्यांचा स्ट्रगल त्यांनी सुरू ठेवला होता. पण अखेर काहीच होत नाही हे बघून ते खचले आणि पुन्हा एकदा घरची वाट धरत अमृतसरला रवाना झाले. घरी पोहचताच त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना रिक्षा चालवण्याचा सल्ला दिला पण बॉलिवूडचं स्वप्न बघणारा हा तरूण काही केल्या हार मानणार नव्हता. काही दिवसांनी ते पुन्हा मुंबईत परतले आणि त्यांना अनीता सिनेमात स्टंटमॅनची नोकरी मिळाली आणि त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर काय त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. पुढे लाल बादशाह, प्रेमगंथ, दिलवाले, जिगर, शहंशाह आणि मिस्टर इंडिया अशा एकापेक्षा एक सिनेमांमध्ये काम केलं.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#ajaydevgan arrives at pawan hans for the funeral of his great father #veerudevgan ?

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

मुलगा अजयला हिरो बनवण्याची घेतली होती शप्पथ

स्वतः हिरो बनण्याचं स्वप्न घेऊन आलेल्या वीरू देवगण यांना ते सत्यात उतरवणं शक्य झालं नाही. त्या वेळी बॉलिवूडमध्ये चालत असलेल्या चॉकलेट हिरोंचा लूक आपल्याला जमणं शक्य नाही याचा अंदाज त्यांना आला. शिवाय त्या वेळेस स्ट्रगल करत असलेल्यांपुढे आपण थोडे फिक्के आहोत असं त्यांना वाटलं आणि तेव्हा त्यांनी आपला मुलगा अजयला हिरो बनवण्याची जणू शपथच घेतली असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. पुढे त्यांनी ध्यास घेत अजयसाठी बरीच मेहनत घेतली. फारंच कमी वयात अजयला वेगवेगळे स्टंट्स, घोडेस्वारी आणि फिल्म मेकिंगचे धडे त्यांनी गिरवायला लावले. अखेर त्यांची मेहनत फळाला आली आणि 1991 साली फूल और काटे सिनेमातून अजयने बॉलिवूडमध्ये हिरो म्हणून पदार्पण केलं. बॉलिवूडचा ध्यास घेतलेला हा माणूस खऱ्या अर्थाने सिनेमा जगला. सिनेमातल्या या स्टंट दिग्दर्शकाला आमची ही श्रद्धांजली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
वीरू देवगण यांच्या आठवणींना उजाळा, 14 वर्षांच्या वयात घरातून पळून मुंबईत आले अन् थेट तुरूंगात पोहोचले Description: Viru Devgan Passes away: वीरू देवगण यांनी स्टंट दिग्दर्शक म्हणून प्रसिद्धी आणि लोकप्रियता तर मिळवली पण नावारूपास येण्याआधीचा त्यांचा प्रवास खडतर होता. त्यांच्या स्ट्रगलच्या दिवसातले अनेक किस्से आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles