हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफचा वॉर सिनेमानं कमाईच्या बाबतीत बरेच रेकॉर्ड्स बनवलेत. सिनेमा लवकरच वर्ल्डवाइड 400 कोटींचा आकडा पार करणार आहे. वॉर सिनेमाचा इंडियाचं नाही तर वर्ल्डवाइड धमाकेदार कमाई झाल्यानं हृतिक- टायगरचा हा सिनेमा 10 वा हायएस्ट ग्रोसिंग सिनेमा बनला आहे. हो खरंच, या सिनेमानं कबीर सिंह या सिनेमाला 11 व्या स्थानावर टाकून 10 वं स्थान आपल्या नावावर केलं आहे. नव्या यादीनुसार बाहुबली, दंगल, संजू, टायगर जिंदा है, बजरंगी भाईजान, पद्मावत, सुल्तान आणि धूम-3 नंतर वॉर हायएस्ट ग्रोसिंग सिनेमाच्या यादीत समाविष्ठ झाला आहे.
हृतिक रोशन-टायगर श्रॉफचा सिनेमा वॉरनं यावर्षी सर्वांत जास्त कमाई करणारा शाहिद कपूर-कियारा अडवाणीचा सिनेमा कबीर सिंहवर देखील मात केली आहे. दुसऱ्या आठवड्याच्या कलेक्शननंतर सिनेमानं हिंदी सिनेमांत 268.30 कोटींची कमाई केली आहे. त्यासोबतच तमिळ- तेलुगू कलेक्शन एकत्र केल्यानंतर सिनेमाची भारतातली कमाई 280.60 कोटींचा आकडा पार केला आहे.
वर्ल्डवाइड कलेक्शनबद्दल बोलायचं झाल्यास वॉरनं 11 मिलियन डॉलरचा आकडा पार केला आहे. हृतिक-टायगर यांच्या सिनेमानं दोन आठवड्यात 79.80 कोटींची कमाई केली आहे. ज्यात #USA- #Canada मध्ये 3.641 मिलियन डॉलर, #UAE- #GCC मध्ये 4.060 मिलियन डॉलर, #UK मध्ये 729 हजार डॉलर व्यतिरिक्त सुद्धा काही आणखी सिनेमाची कमाई समाविष्ठ आहे. अशात इंडिया आणि परदेशातली कमाई मिळून सिनेमानं वर्ल्डवाइड 360.4 कोटींचं कलेक्शन केलं आहे आणि लवकरच सिनेमा 400 कोटींच्या क्लबमध्ये समावेश होईल.
गांधी जयंतीच्या दिवशी रिलीज होणाऱ्या वॉर सिनेमाचे हे रेकॉर्ड्स ब्रेक करणं आता सोपं नाही आहे. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफचा वॉर सिनेमात दर्शकांना एकापेक्षा एक स्ंटट आणि मोठ्या प्रमाणात अॅक्शन सिन्स बघायला मिळाले आहेत. सिद्धार्थ आनंद यांचं डायरेक्शनमध्ये बनलेला हा सिनेमा दर्शकांच्या खूप पसंतीस उतरला. वॉर सिनेमात हृतिक आणि टायगर व्यतिरिक्त वाणी कपूर, आशुतोष राणा, अनुप्रिया गोयंका, दीपानिता शर्मा यांच्या महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळतात.