Bold Web Series : एकट्याने बघा या वेब सीरिज; कुटुंबासोबत पाहाल तर मिळतील दणके

बी टाऊन
भरत जाधव
Updated Mar 03, 2023 | 14:37 IST

डिजिटल प्लेटफॉर्मवर (Digital platform)वेब सीरिजने (Web series) धमाल माजवली आहे.  सध्या असा कोणीस सापडणार नाही ज्याला वेब सीरिज माहिती नसेल. सर्वांनी वेबसीरिज पाहिल्या असतील. या वेबसीरिजमुळे टीव्हीवरील (TV) मालिकांची लोकप्रियता खूप कमी झाली आहे.

Watch this web series alone; If you watch it with family, you will get bangs
Bold Web Series : एकट्याने बघा या वेब सीरिज नाहीतर...   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • वेबसीरिजमुळे टीव्हीवरील (TV) मालिकांची लोकप्रियता खूप कमी झाली आहे.
  • वेबसीरिजमध्ये 8 ते 10 एपिसोड असतात
  • प्राईम व्हिडिओवरील या वेबसीरिज कुटुंबासह पाहणं टाळावं.

मुंबई :   डिजिटल प्लेटफॉर्मवर (Digital platform)वेब सीरिजने (Web series) धमाल माजवली आहे.  सध्या असा कोणीस सापडणार नाही ज्याला वेब सीरिज माहिती नसेल. सर्वांनी वेबसीरिज पाहिल्या असतील. या वेबसीरिजमुळे टीव्हीवरील (TV) मालिकांची लोकप्रियता खूप कमी झाली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे कथानकासोबत प्रयोग होत आहे आणि नवनवीन कंटेंट प्रेक्षकांना अनुभवयास मिळत आहे. टीव्ही पेक्षा वेगळा येथे सासु-सुनेचा बोरिंग ड्रामा नसतो आणि दीर्घ ब्रेकही नसतात. ( Watch this web series alone; If you watch it with family, you will get bangs)

अधिक वाचा  : स्वस्तातील हनीमूनसाठी भारतातील या ठिकाणी जा

चित्रपट आणि टीव्ही सीरियल पेक्षा वेबसीरिजमध्ये 8 ते 10 एपिसोड असतात. ही सीरिज वेगवेगळ्या कथानकावर आधारित असते. एक एपिसोड 25 ते 45 मिनिटापर्यंत असतो. या वेब सीरिज डिजिटल प्लेटफॉर्मवर बऱ्याचदा एकसोबत लॉन्च केल्या जातात, तर काहीवेळेस दर आठवड्याला एक एपिसोड लॉन्च केला जातो. वेब सीरिजमध्ये कंटेंट सर्वात मोठे हत्यार आहे. येथे निर्माता-दिग्दर्शकांना बोल्ड कंटेंटपासून अशा बऱ्याच विषयांवर सीरिज बनवायला मुभा असते. यामुळेच वेबसीरिज ह्या सध्या हीट होत आहेत. याच कारणामुळे काही अशा वेबसीरिज आहेत ज्या तुम्ही आपल्या कुटुंबियांसोबत बघू नयेत. जर तुम्ही कुटुंबियांसोबत या वेबसीरिज पाहाल तर तुम्हाला फटके मिळू शकतात. 
अधिक वाचा  : पोरांनो सांगा मुलींना काय बरं आवडत? नाही माहीत मग हे वाचा

कुटुंबासह पाहण्यासारख्या नाहीत  Prime Video च्या या वेबसीरिज 

या वेबसीरिज ह्या बोल्ड दृश्यांनी भरलेल्या आहेत, त्यामुळे प्राईम व्हिडिओवरील या वेबसीरिज कुटुंबासह पाहणं टाळावं. जर या वेबसीरिज पाहायच्या असतील तर तुम्ही एकटे आहात याची खात्री करा. तुमच्याकडे हेडफोन आहेत का हे सुनिश्चित करा त्यानंतरच या वेबसीरिज पहा. जर तुम्ही कुटुंबियांसोबत या वेबसीरिज बघाल तर तुम्ही फटके खालं 

अधिक वाचा  :  संयुक्त कुटुंबात असताना पतीसोबत कसा कराल रोमान्स

रसभरी  Rasbhari

स्वरा भास्कर ही इंडस्ट्रीतील सर्वात ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. रासभरी वेब सीरिजमध्ये तिचे अनेक बोल्ड सीन्स आहेत. या  सीरिजमध्ये  तिने एका शिक्षिकेची भूमिका केली आहे. या वेबसीरिजमध्ये एक विद्यार्थी तिच्या प्रेमात पडत असतो. 

फोर मोर शॉट्स Four More Shots  

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर सर्वात लोकप्रिय सीरिजपैकी ही एक वेबसीरिज आहे. यात सयानी गुप्ता, बानी जे , किर्ती कुल्हारी, आणि  मानवी गगरु यांनी काम केलं आहे. ही वेबसीरिज मैत्रीच्या नात्यावर आधारीत आहे. परंतु यात खूप बोल्ड संवाद आहेत तसेच सीनदेखील आहेत. 

अधिक वाचा  :  मुलं असं करत असतील तर प्रेमात तुमचाही दिग्यासारखा गेम होणार

मेड इन हेवन   Made in Heaven

ही दिल्लीमधील हायप्रोफाइल लग्न समारंभ विषयी तयार करण्यात आलेली ड्रामा सीरिज आहे. या वेबसीरिजला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कारण या वेबसीरिजमध्ये बोल्डनेस भरपूर आहे. जर तुम्हाला ही वेबसीरिज पाहायची असेल तर तुम्हाला एकट्याने पाहावे लागले. 

स्कल्स अॅण्ड रोझेस  Skulls and Roses

हा एक रिऑलिटी सारखा शो आहे, यात  तुम्हाला रोडीज शो आठवतोय का? आणि त्यातील क्रूर असे जज रघु राम आणि राजीव लक्ष्मण हे आठवतात का? ही जोडी या शोमध्ये काम करत आहे. यातही ते जजच्या भूमिकेत आहेत. या वेबसीरिजमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धेकांना प्रेम, साहसी खेळ मध्ये भाग घेण्यास सांगतात आणि त्यांना जगण्याच्या शर्यतीत जिंकण्यास प्रवृत्त करतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी