This Weekend OTT Releases : एकीकडे थिएटरमधील प्रेक्षकांची संख्या कमी होत असताना ओटीटी प्लॅटफॉर्मला ( OTT platform ) मात्र, प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अर्थात त्याच कारणही तसंच आहे. कुठेही, कधीही आणि कमी खर्चात घरबसल्या सिनेमा, वेबसीरिज ( Web Series ) पाहाता येते, आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सोयीनुसार हा सगळ्यात मोठा ओटीटीचा फायदा आहे. या आठवड्यात ओटीटीवर ड्रामा, थ्रीलर, रोमान्स आणि अँक्शनचा तडका या आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार आहे. ( Web series and films releases on OTT this weekend )
4 ऑगस्टला कडुआ दाक्षिणात्य सिनेमा ओटीटीवर रिलीज होत आहे. 7 जुलैला थिएटरमध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा संमीश्र प्रतिसाद मिळाला होता. पृथ्वीराज सुकुमारनचा हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झालेला आहे. शाजी कैलास दिग्दर्शित या सिनेमात अँक्शनचा तडका प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
तुम्हाला रोमान्स आवडत असल्यास, या आठवड्यात तुमच्या भेटीला येत आहे वेडिंग सीझन हा सिनेमा. या सिनेमात आशा आणि रवीची कथा आहे. जे त्यांच्या पालकांना खूश करण्यासाठी एकमेकांना डेट करण्याचे नाटक करतात. त्यांच्यावर लग्नाचा दबाव आहे. मात्र, जसजसा वेळ जातो तसतसे ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. सूरज शर्मा आणि पल्लवी शारदा या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. नेटफ्लिक्सवर हा सिनेमा पाहाता येणार आहे.
अधिक वाचा : हाॅलिवूड स्टार देव पटेल बनला रियल लाईफ हिरो
द ग्रेट वेडिंग ऑफ मुन्नेस ही वेबसीरिजही 4 ऑगस्टला रिलीज झाली आहे. ही एक कॉमेडी वेबसीरिज आहे. अभिषेक बॅनर्जीसह बरखा सिंग यात प्रमुख भूमिकेत आहे. एका लग्नाळू मुलाच्याभोवती वेबसीरिजची कथा फिरते.
आलिया भट्ट आणि शेफाली शाह स्टारर डार्लिंग्स हा सिनेमा 5 ऑगस्टला रिलीज होत आहे. त्याचे दिग्दर्शन जसमीत के यांनी केले आहे. ही एक ब्लॅक कॉमेडी असून बद्रूभोवती सिनेमाची कथा फिरते. आलिया भटसह विजय वर्मा दिसणार आहे. सस्पेन्स, थ्रीलरचा तडका या सिनेमात पाहाता येणार आहे.
अधिक वाचा : गुळाचा छोटासा तुकडा बदलू शकतो आयुष्य
तामिळ अँथॉलॉजी असलेला 'व्हिक्टिम' 5 ऑगस्ट रोजी OTT वर प्रीमियर होणार आहे, या वेबसीरिजमध्ये निर्माते चिंबुदेवन, राजेश एम, पीए रंजित आणि व्यंकट प्रभू यांनी दिग्दर्शित केले आहेत. "गुन्हा केल्यावर शारीरिक किंवा भावनिक दुखापत झालेल्या पीडितांभोवती फिरणारी ही कथा आहे. पण ते स्वतःला गुन्ह्यापासून वाचवतील का?" ते यात पाहायला मिळणार आहे. अमला पॉल, प्रिया भवानी शंकर, गुरू सोमसुंदरम, लिझी अँटोन, प्रसन्ना, नटराज सुब्रमण्यम, थंबी रामय्या, कलैरासन हरिकृष्णन आणि नासेर एम या वेबसीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.
पक्का कमर्शियल हा कन्नड सिनेमा 5 ऑगस्टला ओटीटीवर रिलीज होणार आहे. अँक्शन थ्रीलर असलेला या सिनेमात राशि खन्ना, सत्यराज, वरलक्ष्मी सरथकुमार, राव रमेश,
अजॉय घोष, किरण तलसिला, सप्तगिरी, साई कृष्णा आणि रमना रेड्डी यांच्या या सिनेमात भूमिका आहेत.
अधिक वाचा : जाणून घ्या कधी आहे नारळी पोर्णिमा, यासंबंधित गोष्टी
कोटा फॅक्टरीच्या धर्तीवर, विद्यार्थी जीवनावर आधारित क्रॅश कोर्स ही वेबसीरिज ५ ऑगस्टला रिलीज होत आहे. प्रेक्षक ही वेबसीरिज Amazon Prime Video वर पाहू शकतात. या वेबसीरिजमध्ये विद्यार्थी, त्यांची स्वप्ने, पालकांचा त्रास, विद्यार्थी जीवनातील संघर्ष यांचे सुंदर चित्रण करण्यात आले आहे. या वेबसीरिजमध्ये 10 एपिसोड्स असून अन्नु कपूर या सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
विराट कोहलीसारख्या दिसणाऱ्या क्रिकेटपटूच्या आयुष्यावर आधारित 'मॅच ऑफ लाइफ' 5 ऑगस्टला रिलीज होणार आहे. या चित्रपटात राजपाल यादव, शशिकांत शर्मा आणि सुधा चंद्रन दिसणार आहेत. याचे दिग्दर्शन मनोज गिरी यांनी केले आहे.