New OTT Release This Week : पॅन्डेमिकमध्ये ओटीटीने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. त्यावेळी मोठमोठे सिनेमाही ओटीटीवर रिलीज झाले. आता तर प्रेक्षक दर आठवड्याला काय नवीन पाहायला मिळणार याचीच वाट पाहात असतात. ज्यांना थिएटरमध्ये जावून सिनेमा पाहणं शक्य होत नाही ते या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हे सिनेमा पाहू शकतात. चला तर मग जाणून घेऊया या आठवड्यात ओटीटीवर कोणते सिनेमा आणि वेबसीरिज रिलीज होणार ते.
डिस्नी हॉटस्टारवर मार्वलची डॉक्टर स्ट्रेंज इन मल्टीवर्स ऑफ मॅडनेस हा सिनेमा रिलीज झाला आहे. बेनेडिक्ट काम्वारबेच पुन्हा एकदा डॉक्टर स्ट्रेंजच्या अंदाजात पाहायला मिळतोय. हा सिनेमा 6 मे रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. सिनेमाने ठिकठाक कलेक्शन केले असे म्हणायला हरकत नाही. इंग्रजीसोबतच हा सिनेमा हिंदी, तामिळ,तेलगू, मल्याळम, कन्नड भाषेतही रिलीज झाला आहे.
नेटफ्लिक्समवर द घोस्ट डॉक्टर या वेबसीरिजचा पहिला सीझन रिलीज झाला आहे. हा एक कोरियन मेडीकल ड्रामा आहे. विरूद्ध व्यक्तीमत्त्व असलेल्या दोन डॉक्टरांभोवती वेबसीरिजची कथा फिरते. या वेबसीरिजमध्ये एका डॉक्टराचा आत्माएका पेशंटमध्ये जातो, आणि त्यानंतर काय काय घडतं त्याची ही कथा आहे.
अॅमेझॉन मिनी टीव्हीवर रोमॅण्टिक वेबसीरिज इश्क एक्सप्रेस रिलीज झाली आहे. सीरिजमध्ये आरव आणि तान्याची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. दोघांची मुलाखत एका ट्रेनच्या प्रवासादरम्यान होते आणि मग नंतर दोघांचा पुढचा प्रवास सुरू होतो. वेबसीरिजची कथा आणि दिग्दर्शन तन्मय रस्तोगी आणि सौरभ जॉर्जने केले आहे.
डिस्ने हॉटस्टारवर म्युझिकल फिल्म ट्रेवर-द म्युझिकल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच मिस मार्वलच्या पहिल्य सीझनचा तिसरा एपिसोडचं स्ट्रिमिंगही करण्यात येणार आहे.
झी 5 वर इन्व्हेस्टिगेटिंग फिल्म फॉरेन्सिक रिलीज होत आहे. सायकॉलॉजिकल थ्रीलर असलेल्या या सिनेमात विक्रांत मेसी आणि राधिका आपटे प्रमुख भूमिकेत आहेत. विशाल फुरिया दिग्दर्शित फॉरेन्सिक या मल्याळम फिल्मचा हा हिंदी रिमेक आहे. विक्रांत आणि राधिकासोबत प्राची देसाई, विंदू दारासिंह, रोहित रॉयसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
तर जगभरात लोकप्रिय ठरलेली मनी हाईस्ट ही वेबसीरिज पुन्हा येणार आहे. मात्र, यावेळी ती कोरिया स्पेशल असेल. मुळच्या स्पॅनिश भाषेत असलेल्या या वेबसीरिजचा कोरिअन भाषेत रिमेक करण्यात येणार आहे.
सोनी लिववर अवरोध या वेबसीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या शोमध्ये अबीर चॅटर्जी, मोहन आगाशे, नीरज काबी अनंत, अनंत महादेवन, संजय सूरी आणि राजेश खट्टर प्रमुख भूमिकेत आहे.