Bollywood : बॉलिवूडमध्ये लग्नाचा सिझन.. हे हॉट कपल अडकणार लग्नबंधनात?

बी टाऊन
विजय तावडे
Updated Oct 27, 2021 | 23:34 IST

Ranbeer-Aaliya: बॉलिवूडमधील मोस्ट लग्नाळू कपल म्हणजे रणबीर-आलिया.. येत्या डिसेंबरमध्ये हे कपल लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा बी टाऊनमध्ये रंगलीय. इटलीमध्ये हे कपल लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जातंय.

Wedding season in Bollywood .. Will this hot couple get married?
रणबीर-आलिया डिसेंबरमध्ये लग्न करणार, इटलीत होणार लग्न?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मोस्ट हॉट कपल अडकणार लग्नबंधनात
  • इटलीत डिसेंबरमध्ये होणार लग्न सोहळा ?
  • आम्ही लग्नाळू.... आम्ही लग्नाळू...


Bollywood Weddings : 'लग्नाचा हंगाम' सुरू झाला आहे. लग्नाचा सीझन सुरू होताच बॉलिवूडमधील लव्ह बर्ड्सची चांगलीच चर्चा रंगली आहे. 
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाच्या चर्चेदरम्यान बी-टाऊनचे हॉट कपल आलिया भट्ट (Aaliya bhatt) आणि रणबीर कपूर (ranbeer kapoor ) यांच्या लग्नाच्या बातम्यांनी पुन्हा एकदा जोर पकडला आहे. दोघांच्या लग्नाबाबत अशा बातम्या समोर येत आहेत, आलिया-रणबीरचे लग्न बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा भाग आहे.नीतू कपूर लवकरच आलिया भट्टला नववधूच्या रूपात आपल्या घरात आणणार असल्याचं म्हटलं जातंय. गेल्या वर्षीही आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाबाबत बातम्या आल्या होत्या, मात्र कोरोनामुळे त्यांना हा निर्णय मागे घ्यावा लागला होता, असे मानले जात होते. आता अशी बातमी आहे की, कतरिना कैफ आणि विकी कौशलप्रमाणे हे कपलही 
या वर्षी डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे.


'अँनिमल'चे शूटिंग पुढे ढकलले

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया आणि रणबीर दीर्घ प्रतीक्षेनंतर यावर्षी डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चांना बी-टाऊनमध्ये उधाण आलंय. 
मात्र, बातमी अशी आहे की, 'ब्रह्मास्त्र' नंतर रणबीर कपूर (ranbeer kapoor ) त्याच्या आगामी 'अॅनिमल' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार होता. परंतु त्यांनी त्याचे वेळापत्रक जानेवारी २०२२ पर्यंत पुढे ढकलले आहे. या चित्रपटात रणबीरसोबत परिणीती चोप्रा, अनिल कपूर, बॉबी देओल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.


आलिया भट्ट नवीन वर्षानंतर काही नवीन काम करणार आहे

त्याच वेळी, आलिया भट्टबद्दल (Aaliya bhatt) बातम्या आहेत की ती देखील ऑक्टोबरपर्यंत तिच्या सर्व असाइनमेंट पूर्ण करेल आणि 
नोव्हेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात स्वत: ला फ्री ठेवणार आहे.

अनुष्का (anushka)-विराट(virat)प्रमाणे लग्न करणार

क्रिकेटर विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माप्रमाणे आलिया-रणबीर इटलीत लग्नगाठ बांधणार असल्याचंही बोललं जात आहे. 
आलिया-रणबीरच्या लग्नाला फार कमी लोक उपस्थित राहणार आहेत. त्यात दोन्ही कुटुंबातील काही लोकांची आणि काही खास मित्रांची नावे आहेत.


विकी-कतरिनाने तयारी सुरू केली

त्याचवेळी, विकी कौशल आणि कतरिना कैफच्या साखरपुड्यानंतर, दोघे डिसेंबरमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याची बातमी आहे. 
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सब्यसाची दोघांच्या लग्नाचे कपडे डिझाइन करत आहे. कतरिनाने तिच्या आउटफिटसाठी रॉ सिल्क मटेरियल निवडलं आहे, जो लेहेंगा असेल. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या दोघांचं लग्न होणार असल्याचं म्हटलं जातंय. या प्रकरणी दोघांनीही आतापर्यंत मौन बाळगले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी