लॉकडाऊनमध्ये बंद आहेत जिम्स आणि वाढत असेल वजन, करीना कपूरच्या वर्कआऊट टिप्स करा फॉलो

बी टाऊन
Updated May 15, 2021 | 13:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या देशातल्या बऱ्याच भागांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे घरी बसल्या बसल्या अनेक लोकांचे वजन वाढत आहे. मात्र करीना कपूरचे वर्कआऊट फॉलो करून आपण घरच्या घरीच फिट राहू शकता.

Kareena Kapoor
लॉकडाऊनमध्ये बंद आहेत जिम्स आणि वाढत असेल वजन, करीना कपूरच्या वर्कआऊट टिप्स करा फॉलो  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • करीनाकडून आपण घेऊ शकता वजन कमी करण्याची प्रेरणा
  • करीनाचे हे व्यायाम आणि फिटनेस फॉलो करून राहा फिट
  • हे आहे करीनाचे फिटनेस डाएट

मुंबईः लॉकडाऊनच्या (Lockdown) या काळात जिम (gyms) बंद (closed) असल्यामुळे घरी बसून बऱ्याच जणांचे वजन वाढत (weight gain) आहे. मात्र ज्या लोकांना फिटनेसचे वेड (fitness freaks) आहे ते जिम बंद असूनही स्वतःला मेंटेन (maintain) करत आहेत. याचे उदाहरण म्हणजे करीना कपूर (Kareena Kapoor) जी आपल्या घरीच (home) व्यायाम (exercise) करून शेपमध्ये (shape) परतली आहे. आम्ही आपल्याला बेबोच्या फिटनेसचे गुपित (fitness secret) सांगणार आहोत ज्या वापरून आपणही फिट अँड फाईन (fit and fine) राहू शकता.

करीनाकडून आपण घेऊ शकता वजन कमी करण्याची प्रेरणा

सध्या फिटनेस केंद्रे बंद असल्यामुळे आता सेलिब्रिटीजही आपल्या घरीच वर्कआऊट करत आहेत. करीना कपूर दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर बरीच जाड झाली होती, पण आता वजन कमी करण्यासाठी ती बरीच मेहनत करत आहेत. ती अनेकदा आपल्या इन्स्टाग्रामवर आपल्या वर्कआऊटचे फोटो शेअर करत असते. तिच्या या फोटोंमध्ये साफ दिसत आहे की बेबो आता पहिल्यापेक्षाही फिट झाली आहे आणि लवकरच ती शेपमध्ये परतणार आहे. करीना ही आपल्या झीरो साईज फिगरमुळे प्रसिद्ध आहे. जिमला न जाता करीना सध्या आपल्या घरीच योगाची मदत घेत आहे. तिने एका मुलाखतीत आपल्या फिटनेस मंत्राची माहिती दिली होती की ती रोज सकाळी तिचा आवडता व्यायाम म्हणजेच सूर्यनमस्कार आवर्जून करते.

करीनाचे हे व्यायाम आणि फिटनेस फॉलो करून राहा फिट

करीना कपूर आपल्या घरीच सूर्यनमस्काराशिवाय जिम्नॅस्टिक वर्कआऊटही करते. ती गर्भावस्थेच्या काळातही वर्कआऊट आणि योगा करत होती. याशिवाय ती चालण्याचा व्यायामही करते, पण योगा आणि फंक्शनल ट्रेनिंग हा तिच्या फिटनेसचा मंत्र आहे. वर्कआऊट सेशनमध्ये करीनाला प्लाटे करणे सर्वात जास्त आवडते. याशिवाय रोप एक्सरसाईज, केटरल बेल स्क्वाट्स आणि बॉक्सिंग करणेही तिला आवडते.

हे आहे करीनाचे फिटनेस डाएट

आपला फिटनेस करण्यासाठी ती आपल्या खाण्यापिण्यावरही नियंत्रण ठेवते. बाहेर जाऊन जंकफूड खाण्याऐवजी ती घरीच खाणे पसंत करते आणि रात्री 8 वाजता रात्रीचे जेवण घेते. ती पूर्वी मांसाहार घेत असे, पण गेल्या 10 वर्षांपासून तिने मांसाहार सोडून दिला आहे. ती वरणभात आणि खिचडी खाणे पसंत करते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी