मुंबई : करीना कपूर आणि सैफ अली खानचे चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्रीने रविवारी आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. यावर सैफ म्हणाले 'आम्हाला मुलगा झाला आहे. आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत. प्रेम आणि सोबतीसाठी तुम्हा सर्व शुभचिंतकांचे आभार.' प्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञ संजय बी. जुमानी यांच्यानुसार, या बाळाशी निगडीत संख्या ३ ही आहे. त्याने बाळाचे भविष्य कसे असेल याचा अंदाज यावरून लावता येतो.
संजय बी जुमानी यांनी झूम डिजीटलला सांगितले, 'ज्योतिष संख्याशास्त्रानुसार ३ संख्या असल्याने त्यांचा मुलगा ते सर्व करू शकतो जे त्यांना करावे वाटत होते. ३ ही संख्येचे नेतृत्व बृहस्पती करत असतो. त्यामुळे हे बाळ पतौडी परिवारासाठी भाग्यषाली ठरणार आहे. बृहस्पती हा धन, ज्ञान आणि समृद्धी चा ग्रह मानला जातो. याव्यतिरिक्त हे बाळ १ या संख्येशीही संबंधीत आहे. ज्याचं नेतृत्व सूर्य करत असतो.
करीनाला मुंबईच्या ब्रीच कँडी दवाखान्यात दाखल केले आहे. त्यांचे वडील रणधीर कपूर यांनी पहिल्यांदा कुटुंबाला बाळाच्या जन्माची बातमी दिली. ते म्हणाले, 'करीनाने आज सकाळी एका बाळाला जन्म दिला आहे. समाज माध्यमांवर प्रसिद्ध असणाऱ्या तैमूरला छोटा भाऊही मिळाला. तैमूरचा जन्म २० डिसेंबर, २०१६ ला झाला होता. तो इंटरनेटवर सर्वात प्रसिध्द झाला होता आणि त्याचे फोटो सगळीकडे दिसत होते. बाळाचे सौंदर्य लोकांची मने जिंकण्यास यशस्वी होत होते.
आज तैमूर आपल्या लहान भावाला भेटण्यासाठी दवाखान्यात जाताना दिसला. करीना आणि सैफसुद्धा मुलांना चांगली जागा मिळावी म्हणून नवीन घरात गेले होते.