Sonakshi sinha dating Zaheer Iqbal: सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालमध्ये नेमके नाते काय? सोशल मीडियावर व्यक्त केले प्रेम?

बी टाऊन
Updated Dec 11, 2021 | 16:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Relation: सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल बऱ्याच काळापासून एकमेकांच्या जवळ आहेत. सोनाक्षीने झहीरच्या वाढदिवशी एक पोस्ट लिहिली असून त्यामध्ये दोघांनीही त्यांच्या नात्याला पुष्टी दिल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगत आहे.

Sonakshi sinha dating Zaheer Iqbal?
सोनाक्षी झहीर इक्बालला करत असल्याची बॉलिवूडमध्ये चर्चा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या डेटींगच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत.
  • सोनाक्षी सिन्हाने झहीर इक्बालच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट लिहिली आहे.
  • झहीर इक्बाल सलमान खानच्या जवळचा आहे, नोटबुक सिनेमातून सलमान खाननेच केले होते लॉन्च

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Relation: मुंबई : बॉलिवूडमध्ये कधी काय घडेल काही सांगता येत नाही. विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नानंतर आता बातमी आहे सोनाक्षी सिन्हाची. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांच्या डेटिंगच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. मात्र, दोघांनीही अद्याप या नात्याला दुजोरा दिलेला नाही. सोनाक्षी सिन्हाने झहीर इक्बालच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट लिहिली आहे, ज्यानंतर दोघांनीही त्यांच्या नात्याचा स्वीकार केल्याचे म्हटले जात आहे. 


झहीर इक्बालने 10 डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने सोनाक्षी सिन्हाने स्वतःचा आणि झहीर इक्बालचा एक फोटो शेअर केला आहे. 
फोटोसोबत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जगातील सर्वात त्रासदायक व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपण जगातील सर्वोत्तम व्यक्ती देखील आहात. हे कसे घडू शकते? तू असा कसा आहेस? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बाय.'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)


झहीर इक्बालनेही सोनाक्षीच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली

झहीर इक्बालनेही सोनाक्षी सिन्हाच्या फोटोवर कमेंट केली आहे. झहीरने लिहिले, ' ती माझी बेस्ट फ्रेंड आहे.' त्याचवेळी, त्याच्या दुसऱ्या कमेंटमध्ये झहीर इक्बालने लिहिले की, 'आता मी तुम्हाला अधिकृतपणे माझी हिरोईन म्हणू शकतो का?' आता हे असं लिहिण्याचं कारण, आगामी डबल एक्सएल सिनेमात झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा एकत्र दिसणार आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)


झहीर सलमान खानच्या जवळचा आहे


झहीर इक्बाल हा सलमान खानच्या खूप जवळचा आहे. सलमान खान आणि झहीरचे वडील इक्बाल रत्नासी हे बालपणीचे मित्र आहेत. झहीरला सलमान खानने नोटबुक या चित्रपटाद्वारे फिल्म इंडस्ट्रीत लॉन्च केले होते.


नोटबुक या चित्रपटात झहीर इक्बालसोबत प्रनूतन बहल मुख्य भूमिकेत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानमुळेच सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांची पहिली भेट झाली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी