Bollywood News : जेव्हा ऐश्वर्याने जिंकला होता मिस वर्ल्डचा किताब, त्यावेळच्या अभिषेक बच्चनचा फोटो पाहून यूजर्सही थक्क

बी टाऊन
Updated Aug 19, 2022 | 16:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

Aishwarya and Abhishek Bachchan : सोशल मीडियावर अभिनेता अभिषेक बच्चनचा Abhishek Bachchan) जुना फोटो व्हायरल होत आहे. या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. कारण,हा फोटो 1994 सालचा आहे. अभिषेकचा फोटो व्हायरल होताच यूजर्सने त्या फोटोची तुलना ऐश्वर्याच्या ( Aishwarya Bachchan ) जुन्या फोटोशी करायला सुरुवात केली.

When Aishwarya rai won the miss world title Abhishek Bachchan looked like this
अभिषेक बच्चनचा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अभिषेक बच्चनचा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल
  • यूजर्सकडून ऐश्वर्या आणि अभिषेकच्या फोटोंची तुलना
  • अभिषेकचा फोटो पाहून सारेच थक्क

Aishwarya and Abhishek Bachchan : सोशल मीडियावर अभिनेता अभिषेक बच्चनचा ( Abhishek Bachchan) जुना फोटो व्हायरल होत आहे. या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. कारण,हा फोटो 1994 सालचा आहे. अभिषेकचा फोटो व्हायरल होताच यूजर्सने त्या फोटोची तुलना ऐश्वर्याच्या ( Aishwarya Bachchan ) जुन्या फोटोशी करायला सुरुवात केली. 1994 मध्ये तेव्हा ऐश्वर्याने मिस वर्ल्डचा (Miss World ) किताब जिंकला होता. तर अभिषेकचा हा फोटो ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्यासोबत आहे. आता मात्र, ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा सुखाचा संसार सुरु आहे. ( When Aishwarya rai won the miss world title Abhishek Bachchan looked like this )

ऐश्वर्या राय बच्चनला कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने केवळ भारतातच नाही तर जगभरात नाव कमावले आहे. ऐश्वर्या सध्या चित्रपटांमध्ये फारशी सक्रिय नाही. मात्र असे असूनही अनेकदा ती प्रसिद्धीच्या झोतात राहते.

अधिक वाचा : राजू श्रीवास्तवबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका, मॅनेजरचे आवाहन

ऐश्वर्या राय बच्चनने 2007 साली बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. मात्र, लग्नापूर्वी ऐश्वर्याच्या अफेअर्सची खूप चर्चा होती. पण आता ऐश्वर्या आणि अभिषेकचे उदाहरण दिले जाते. 


1999 मध्ये ऐश्वर्याने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला डेट करायला सुरुवात केली. 2002 मध्ये हे जोडपे वेगळे होईपर्यंत ती अनेकदा त्यांच्या नात्यामुळे मीडियात आली होती. 
तिच्या ब्रेकअपसाठी अभिनेत्रीने सलमानच्या रागीट स्वभावाला जबाबदार धरले. ऐश्वर्याने सलमानवर मारहाणीचा आरोपही केला होता. सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिचे नाव अभिनेता विवेक ओबेरॉयशी जोडले गेले. पण शेवटी ऐश्वर्याने ज्युनियर बच्चनला आपला साथीदार म्हणून निवडले. 

अधिक वाचा : सपना चौधरीच्या ठुमक्यांवर थिरकत बीडमध्ये दहीहंडी

Journey to the crown and beyond: India's most successful Miss World Aishwarya Rai Miss India | Femina Miss India 2015

सोशल मीडियावर अनेकदा ऐश्वर्या रायच्या सौंदर्याच्या चर्चा ऐकायला मिळतात. मात्र, यावेळी अभिषेक बच्चनचा 1994 सालचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
फोटोमध्ये तो त्याची आई जया बच्चनसोबत दिसत आहे. हा फोटो फिल्मफेअर मॅगझिन 1994 चा असल्याचं म्हटलं जात आहे. 

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही चाहते या फोटोची तुलना 1994 मधील ऐश्वर्याच्या फोटोशी करत आहेत. वास्तविक ऐश्वर्या 1994 मध्ये मिस वर्ल्ड बनली होती तर अभिषेक त्यावेळी असा दिसत होता. मात्र, आता या दोघांचा सुखाचा संसार सुरू आहे. ऐश्वर्या आता बच्चन घराण्याची सून आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी