जेव्हा ऋषी कपूरच्या लग्नात भेटले होते अमिताभ बच्चन आणि रेखा, रडल्या होत्या जया बच्चन

बी टाऊन
Updated Jun 29, 2020 | 13:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

when amitabh bachchan and rekha meet in rishi kapoor wedding:काही पुस्तके आणि रिपोर्ट्सनुसार जेव्हा ऋषी कपूर यांच्या लग्नात रेखा अमिताभ बच्चनला भेटायला गेली तेव्हा जया बच्चन यांच्या डोळ्यात पाणी आले होते. 

rekha
जेव्हा ऋषी कपूरच्या लग्नात भेटले होते अमिताभ बच्चन आणि रेखा 

थोडं पण कामाचं

  • ऋषी कपूरच्या लग्नात अमिताभ बच्चन आणि रेखा यांची भेट झाली होती
  • अमिताभ आणि रेखा यांना एकत्र बोलताना पाहून जया बच्चन यांच्या डोळ्यात पाणी तरळले होेते
  • कुंकू लावून कार्यक्रमात पोहोचली होती रेखा

मुंबई: जेव्हा बॉलिवूडमध्ये रोमान्स आणि वादांबाबतच्या गोष्टी समोर येतात तेव्हा डोक्यात काही नावे समोर येतात त्यात अमिताभ बच्चन(amitabh bachchan) आणि रेखा(rekha) यांचे नाव समोर येते. या दिग्गज कलाकारांनी एकत्र अनेक सिनेमांमध्ये काम केले. हे सिनेमे हिटही ठरले. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक प्रकारचे रिपोर्ट्स आणि अफवा समोर येत आहेत. रेखाला नेहमीच एक पहेली म्हणून पाहिले जाते.

रेखाच्या खासगी आयुष्याबद्दल प्रत्येकाला जाणून घ्यायची इच्छा असते मात्र ही अभिनेत्री कधीही आपले जीवन सार्वजनिक करत नाही. यासर उस्मान यांनी लिहिलेले पुस्तक रेखा: द अनटोल्ड स्टोरी नावाच्या आत्मकथेत अनेक घटनांची माहिती दिली आहे. यात ऋषी कपूर(rishi kapoor) आणि नीतू कपूर(neetu kapor) यांच्या १९८०मध्ये झालेल्या लग्नातील किस्साही सामील आहे. येथे नवरा आणि नवरी यांच्याऐवजी रेखा लाईमलाईटमध्ये आले होते. 

कुंकू लावून रेखा पोहोचली होती

या पुस्तकानुसार रेखा आणि नीतू एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. नीतू कपूरच्या लग्नात रेखा एका सुंदर साडीमध्ये आली होती. प्रत्येकाचे लक्ष तिने घातलेल्या मंगळसूत्र, चुडा आणि कुंकूवाकडे होते. या दरम्यान, या लग्नात सहभागी होण्यासाठी अमिताभ बच्चन आणि जया बच्चनही पोहोचले होते. 

तरळले जया बच्चनचे अश्रू(jaya bachchan cries)

सिने ब्लिट्ज रिपोर्टनुसार लग्नादरम्यान रेखाची नजर अमिताभ बच्चनवर होती आणि आर के स्टुडियोमध्ये रेखा आपली मैत्रीणीसोबत सर्वांसमोर बिग बी यांना भेटायला पोहोचली होती. त्यांच्याशी बराच वेळ बोलत होती. पुढे काही रिपोर्ट्स सांगतात की जया बराच वेळ स्वत:ला संभाळून होत्या मात्र रेखा आणि अमिताभ बच्चन यांना सार्वजनिक ठिकाणी बोलताना पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले

या घटनेनंतर रेखाने असे अनेक प्रश्न मागे सोले ज्याबाबत लोकांना जाणून घ्यायचे होते. त्यानंतर मुलाखतीत रेखाने या घटनेबाबत बोलतान सांगितले की ती एका शूटवरून सरळ लग्नात पोहोचली होती आणि त्यामुळे ती आपले मंगळसूत्र आणि कुंकू काढायला विसरली.

एका रिपोर्टनुसार, जेव्हा माजी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डीने रेखा यांना उमराव जानसाठी सन्मानित केले होते आणि तेव्हा रेखाला तिच्या कुंकू लावण्याबद्दल विचारण्यात आले होते तेव्हा अभिनेत्रीने स्पष्ट शब्दात उत्तर दिले होते की मी ज्या शहरातून येते तेथे कुंकू लावणे फॅशन आहे. आजही रेखा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जाते तेव्हा ती कुंकू लावते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी