Kapil Sharma Comedy: कॉमेडियन कपिल शर्माने (Kapil Sharma) नेटफ्लिक्सवर प्रसारित होणाऱ्या 'आय एम नॉट डन यट' (I'm Not Done Yet) या स्टँड-अप स्पेशल शोमध्ये एक मजेदार किस्सा सांगितला आहे. कपिल शर्माने सांगितले की, जेव्हा तो एकदा रात्री ३ वाजता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) घरी पोहोचला होता. कपिल शर्माच्या म्हणण्यानुसार, एकदा त्याचा चुलत भाऊ मुंबईत आला होता. त्याच्या चुलत भावाने शाहरुख खानचे घर 'मन्नत' पाहण्याची विनंती केली. त्यावेळी कॉमेडियन दारूच्या नशेत होता आणि त्याने चुलत भावाची विनंतीही मान्य केली. कपिल पुढे सांगतो की, 'जेव्हा आम्ही तिथे (शाहरुख खानच्या घरी) पोहोचलो तेव्हा तिथे पार्टी सुरू होती.'
कपिलने सांगितले की, 'शाहरुखच्या घराचे दरवाजे उघडे होते, त्यामुळे मी ड्रायव्हरला गाडी आत घेण्यास सांगितले. सुरक्षा रक्षकांनी मला पाहिले आणि मला जाऊ दिले, त्यांना वाटले की मला निमंत्रण मिळाले असावे. जेव्हा आम्ही आत पोहोचलो तेव्हा मला असं वाटलं, की आपण हे चुकीचं करत आहोत. मला वाटलं इथून निघून जावं पण तेवढ्यात शाहरुख खानचा मॅनेजर बाहेर आला आणि आत यायला सांगितलं.. रात्रीचे ३ वाजले होते.
कपिलने पुढे एक मजेदार किस्सा सांगितला, 'मी शॉर्ट्समध्ये होतो, मी पान चघळत होतो आणि नशेत होतो... दार उघडले तेव्हा गौरी खान (Gauri Khan) आणि तिच्या तीन-चार मैत्रिणी बसल्या होत्या. मी त्यांना 'हॅलो' म्हटलं, ज्यावर त्याने शाहरुख आत असल्याचं उत्तर दिलं. मी आत पोहोचलो तेव्हा शाहरुख त्याच्या ओळखीच्या स्टाईलमध्ये नाचत होता, मी त्याच्या जवळ गेलो आणि म्हणालो भाऊ सॉरी, माझी चुलत बहीण इथे आली होती आणि तिला तुझे घर बघायचे होते, घर उघडे होते म्हणून आम्ही आत आलो.
कपिलच्या म्हणण्यानुसार, किंग खानने त्याला सांगितले की, "माझ्या बेडरूमचा दरवाजा उघडा असेल तर तू तिथेही आत येशील का?'. कॉमेडियन म्हणतो की त्या रात्री शाहरुख खानने आमच्यासोबत खूप वेळ डान्स केला आणि शेवटी मीच त्याच्या घरातून परत आलो.