Bollywood Throwback: जेव्हा करीना कपूरने उघड केले होते अमृता सिंहसोबतचे सिक्रेट

बी टाऊन
Updated Oct 13, 2020 | 16:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

Kareena Kapoor Khan on Amrita Singh: अभिनेत्री करीना कपूर खान आणि सारा अली खानची चांगली बॉन्डिंग आहे. दरम्यान, सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहबाबत करीना कपूरने जे सिक्रेट उघड केले होते ते खरंच हैराणजनक होते

kareena kapoor
जेव्हा करीना कपूरने उघड केले होते अमृता सिंहसोबतचे सिक्रेट 

थोडं पण कामाचं

  • अमृता सिंह सैफ अली खानची पहिली पत्नी आहे
  • सैफ आणि करीनाने२०१२मध्ये लग्न केले
  • सैफच्या कुटुंबियांसोबत करीनाचे चांगले बॉन्डिंग आहे.

मुंबई: करीना कपूरसोबत(kareena kapoor) सैफ अली खान(saif ali khan) आणि अमृता सिंह(amruta singh) यांची मुलगी सारा अली खानयांचे(sara ali khan) एकमेकांशी चांगले पटते. करीना कपूर खान ही सारा अली खानची सावत्र आई आहे. यातच अनेकदा करीना आणि सारा यांच्यातील बॉन्डिंगबाबत सवाल उपस्थित केले जातात. मात्र दोघांमध्ये चांगले बॉन्डिंग आहे. अनेकदा दोघांचे फोटोही सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. कॉफी विथ करणच्या एका एपिसोडदरम्यान करीनाने आपला पती सैफची एक्स पत्नी अमृता सिंहबाबतच्या नात्याबाबत अनेक खुलासे केले होते. 

शोमध्ये करणने करीनाला सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंहसोबतच्या तिच्या नात्याबाबत प्रश्न केला. यावर करीनाने सांगितले, सैफशी लग्न  केल्यानंतर मी आतापर्यंत अमृताला भेटलेली नाही. मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. 'कभी खुशी कभी गम' या सिनेमादरम्यान माझी त्यांच्याशी भेट झाली होती.तेव्हा अमृताने साराला मला भेटायला आणले होते. करीनाने सांगितले सैफशी तिची भेट होण्याच्या खूप आधी तो अमृतापासून वेगळा झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत तिची आणि अमृताची भेट झाली नाही. 

अमृता सिंहचे केले कौतुक

करीनाने सांगितले, माझ्या पतीच्या दोनही मुलांचा सांभाळ अमृताने केलाआहे आणि याचे संपूर्ण श्रेय तिलाच जाते. जेव्हा मी आणि सैफ रिलेशनशिपमध्ये होतो तेव्हा सैफने मला सांगितले होते की माझी मुले माझ्या आयुष्याचा भाग आहेत. सारा-इब्राहिम माझ्याही खूप जवळचे आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

‍‍ #amritasingh #saraalikhan #ibrahimalikhan #familytime #familylove

A post shared by Amrita Singh (@amrita40_) on

सैफची दुसरी पत्नी आहे करीना

करीनाशी लग्न कऱण्याआधी सैफ अली खानने बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंहशी लग्न केले होते. १९९१मध्ये त्यांचे लग्न झाले होते. त्यानंतर २००४मध्ये त्यांचा घटस्फोटही झाला होता. सैफ अली खान आणि करीना कपूरच्या लग्नाच्या नंतरच्या आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास अद्याप या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद झालेला नाही. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी