Salman Khan Bikini Scene: हिंदी चित्रपट सृष्टीतला मेगा सुपरस्टार सलमान खानची खास विशेष ओळख करून देण्याची गरज नाही. आपल्या दमदार अभिनयासाठी सलमान ओळखला जातो. इतकेच नव्हे तर सलमान खानचे नाव अशा काही मोजक्या कलाकारांमध्ये घेतले जाते, जे चित्रपटात कोणत्याही प्रकारचे इंटीमेट सीन करण्यास तयार होत नाहीत. असे असले तरी सलमानला त्याच्या फिल्म कारकीर्दीमध्ये एकदा एका चित्रपटासाठी बिकिणी परिधान करावी लागली होती. इथे आपण जाणून घेऊयात की कोणत्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान ला असे करावे लागले होते. (When Salman Khan Put on Bikini )
अधिक वाचा : दहा दिवसांत कमी करा वजन
1990 मध्ये सलमान खानचा 'बागी' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सलमान खानने एक सीन केला होता, ज्यात तो कॉलेजमध्ये बिकिनी घातलेला दिसत होता. काही काळापूर्वी सलमान खान रजत शर्माच्या आपकी अदालत या शोमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी सलमानने 'बागी' चित्रपटातील बिकिनी सीनबद्दल चर्चा केली.
अधिक वाचा : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्ये मिळणार आता दुहेरी व्याज!
सलमान म्हणाला की, 'एक हॉलीवूड चित्रपट होता, त्याचा सीन बागीमध्ये ठेवला होता. आता ते नाही करू शकत कारण कॉपी राइटचा मुद्दा येतो. त्या सिनमध्ये मला बिकिनी घालून कॉलेजमध्ये पळायचे होते. मात्र असे झाले की चित्रपटाच्या सेट्स सोबत इतर पब्लिकसुद्धा तिथे आली आणि माझ्या मागे पळू लागली. तो माझ्या आयुष्यातील सर्वात बेकार क्षण होता आणि त्यानंतर मला माझी इतकी लाज वाटत होती की कल्पना देखील करवणार नाही. हॉलीवूड चित्रपटाचा सिन घेण्याच्या चक्करमध्ये ते होऊन गेले, आज ही मला त्याची प्रचंड लाज वाटते."
सलमान खानच्या प्रत्येक चित्रपटासाठी त्याचे चाहते आतूर असतात. आगामी काळात सलमानचे दोन मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 21 एप्रिल रोजी सलमान खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. यानंतर भाईजानचा बहुचर्चित 'टायगर 3' देखील दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.