Pushpa 2 Release Date: पुष्पा 2’ कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला? जाणून घ्या दिग्दर्शक मनीष शाह काय म्हणतात..

बी टाऊन
भरत जाधव
Updated Jan 25, 2022 | 08:48 IST

Pushpa 2 : सुपरस्टार(Superstar) अभिनेता (actor) अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा द राइज’ने (Pushpa the Rise) हिंदी मार्केटमध्ये (Hindi Market) जवळपास 80 कोटींचा व्यवसाय केला आहे. ‘पुष्पा’ सध्या ओटीटीवर (OTT) रिलीज झाला आहे पण तरीही बॉक्स ऑफिसवर त्याची कमाई सुरूच आहे.

Pushpa 2 Release Date
पुष्पा 2’ कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?   |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • साधरण 2023 पर्यंत पुष्पा 2 प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे.
  • अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा द राइज’ने हिंदी मार्केटमध्ये जवळपास 80 कोटींचा व्यवसाय केला.
  • पुष्पा 2’ चे शूटिंग जवळपास 250 दिवस चालणार आहे.

Pushpa 2 : मुंबई : सुपरस्टार(Superstar) अभिनेता (actor) अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा द राइज’ने (Pushpa the Rise) हिंदी मार्केटमध्ये (Hindi Market) जवळपास 80 कोटींचा व्यवसाय केला आहे. ‘पुष्पा’ सध्या ओटीटीवर (OTT) रिलीज झाला आहे पण तरीही बॉक्स ऑफिसवर त्याची कमाई सुरूच आहे. पुष्पा या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. चित्रपटाची कथा, गाणे, आणि चित्रपटातील कलाकाराचे अभिनय हे सर्वच घटक प्रेक्षक वर्गाला भावले आहेत. पहिल्या पार्टने प्रेक्षकांना वेड लावल्यानंतर सर्वजण आता दुसऱ्या पार्टची वाट पाहत आहेत. (When will Pushpa 2 'Release?)

साऊथ चित्रपटाला हिंदी पट्ट्यात चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता संपूर्ण देश ‘पुष्पा द रुल पार्ट 2’ च्या आगमनाची वाट पाहत आहे. टेलिफिल्म्सचे दिग्दर्शक मनीष शाह यांनी एका मुलाखतीत ‘पुष्पा 2’ च्या रिलीज तारखेपासूनच्या शूटिंग शेड्यूलबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत मनीष शाह म्हणाले की, ‘पुष्पा: द राइज’ 17 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ 3.33 कोटींची कमाई केली, परंतु ख्रिसमसनंतर या चित्रपटाने हिंदी बॉक्स ऑफिसवर वेग पकडला आणि आज हा चित्रपट 90 कोटींचा आकडा गाठण्यात यशस्वी झाला आहे.

या मुलाखतीत मनीष शाह यांनी सांगितले की, ‘पुष्पा 2- द रुल’चे शूटिंग यावर्षी मार्च किंवा एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. पुष्पा 2 यावर्षी फ्लोअरवर जाईल आणि लवकरच या चित्रपटाचे काम पूर्ण केल्यानंतर निर्माते त्याचा दुसरा भाग रिलीज करतील. याचाच अर्थ म्हणजे पुष्पा 2 ची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांना अजून एक वर्ष तरी प्रतिक्षा करावी लागणार आहे. याचे कारण म्हणजे या दीर्घ चित्रपटाच्या शूटिंगला वेळ लागणार आहे. ‘पुष्पा 2’ चे शूटिंग जवळपास 250 दिवस चालणार आहे. ‘पुष्पा’च्या पहिल्या भागाचे शूटिंग 210 दिवस चालले होते. त्यामुळे शूटिंगवरच त्याचे प्रदर्शन तारीख निश्चित केली जाते. जर कोरोनामुळे लॉकडाऊन असेल किंवा काही अडचण आली तर चित्रपट प्रदर्शित होण्यास वेळ लागू शकतो. साधरण 2023 पर्यंत पुष्पा 2 प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे.

मनीष शाह म्हणाले की, चाहते आणि इंडस्ट्रीशी संबंधित लोकांनी पुष्पाचे खूप कौतुक केले आहे. त्याचा दुसरा भागही सुपरहिट होणार याची सर्वांना खात्री आहे. मला वाटतं पुष्पा 2 इतिहास घडवेल. हे ब्लॉकबस्टर ठरेल. तो किती विक्रम मोडेल हेही मला माहीत नाही. ‘पुष्पा 2’ प्रभासच्या ‘बाहुबली द कन्क्लुजन’चा रेकॉर्ड मोडू शकेल का? यावर मनीष शाह म्हणाले की, ‘बाहुबली’च्या पहिल्या भागाने 120 कोटी आणि ‘पुष्पा’ने 93-94 कोटींची कमाई केली. दोघांमधील फरक फक्त 30 टक्के आहे. जर सर्वांनी मेहनत घेतली तर पुष्पा 2 बाहुबली 2 चा रेकॉर्ड मोडेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी