आई-पतीसोबत सिगारेट पिणारी प्रियंका ट्रोल, अस्थमा कुठे गेला? यूजर्सचा प्रश्न

बी टाऊन
Updated Jul 22, 2019 | 13:16 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

अभिनेत्री प्रियंका चोपडा ही बॉलिवूडमधील अशा सेलिब्रेटींपैकी एक आहे जी नेहमी सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या टार्गेटवर असते. आता प्रियंका पुन्हा एकदा ट्रोल झालीय. कारण एका फोटोमुळे प्रियंका ट्रोल होतेय.

Priyanka Chopra
प्रियंकाच्या सिगारेटवर यूजर्स भडकले,सोशल मीडियावर ट्रोल  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • मायामी येथील सुट्ट्यांचा आहे हा प्रियंकाचा फोटो
  • फोटोमध्ये प्रियंकासोबत पती निक आणि आई मधू चोपडा
  • फोटोमध्ये प्रियंकाच्या हातात सिगारेट तर पती आणि आईच्या हाती सिगार

मुंबई: देसी गर्ल प्रियंका परदेशी मुलाच्या प्रेमात पडली, तिनं त्याच्यासोबत लग्न केलं आणि ती आता परदेशात स्थायिकही झाली. पण प्रियंका चोपडा नेहमीच सोशल मीडियावर टार्गेट होतांना दिसलीय. नुकताच प्रियंकाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या फोटोवरून तिला ट्रोल केलं जातंय. या फोटोमध्ये प्रियंका चक्क सिगारेट ओढतांना दिसतेय. प्रियंकाचा हा फोटो व्हायरल झालाय, तो पाहून अनेक यूजर्स प्रियंकाला तुझा अस्थमा कुठे गेला? हा प्रश्न विचारत आहेत.

प्रियंका चोपडाचा हा व्हायरल झालेला फोटो त्यांच्या मायामी इथल्या सुट्ट्यांचा आहे. फोटोमध्ये प्रियंकासोबत तिचा पती निक जोनस, आई मधु चोपडा सुद्धा दिसत आहेत. फोटोमध्ये निक जोनसच्या हातात सिगार आहे. तर प्रियंका सिगारेट ओढतेय. विशेष म्हणजे प्रियंका चोपडाची आई मधु चोपडा सुद्धा हातात सिगार धरून आहे.

प्रियंकाचा हा फोटो पाहून एका यूजरनं लिहिलंय, ‘प्रियंका चोपडा म्हणतेय की, दिवाळीत फटाके फोडल्यानं प्रदूषण होतं. यामुळे अस्थमा होतो. आता प्रियंका चोपडा सिगारेट ओढतेय.’ तर दुसऱ्या एका यूजर्सनं लिहिलं, ‘आपण अस्थमाचं औषध घेत आहात का?’ तर काही जण प्रियंकाच्या या वागण्याला दुटप्पी वागणं म्हणत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#phirherapherimemes #pherherapheri #priyankachopra #pr #nickjonas #johnylever

A post shared by Meme laya? (@meme_laya) on

 

लग्नात सुद्धा ट्रोल झाली होती प्रियंका

प्रियंका चोपडाचं ट्रोल होणं हे काही पहिल्यांदा घडलेलं नाही. प्रियंका तिच्या लग्नानंतरही ट्रोल झाली होती. प्रियंका चोपडा आणि निक जोनसचं लग्न जोधपूरला झालं. लग्नानंतर जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली होती. ही आतिशबाजी जवळपास ३ मिनिटं सुरू होती. सोशल मीडिया यूजर्सना स्थानिक लोकांच्या बाबतीत प्रियंकाला असंवेदनशील म्हटलं होतं.

तेव्हा सोशल मीडियावर एका यूजरनं म्हटलं होतं, आता कुठे गेलंय सुप्रीम कोर्ट. दिवाळीत फटाके फोडू नका सांगितलं होतं. मग इथे यांना का नाही थांबवलं? तर दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, ‘या सेलिब्रेटींना फटाके फोडण्याची परवानगी का दिली गेली? आता सुप्रीम कोर्ट कुठेय?.’

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Here's the celebration at The Umaid Bhawan Palace #ZoomTV #bollywood #PriyankaChopra #NickYanka #NickJonas

A post shared by Zoom TV (@zoomtv) on

काय लिहिलं होतं प्रियंकानं अस्थमाबद्दल

प्रियंका चोपडानं १७ सप्टेंबर २०१८ रोजी एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये तिनं लिहिलं, ‘मला जे जवळून ओळखतात त्यांना माहितीय की मी एक अस्थमाची पेशंट आहे. मला हे काही लपविण्याची गरज आहे? मला माहितीय की मला अस्थमा कंट्रोल करायचाय. माझ्याजवळ जोपर्यंत इनहेलर आहे, अस्थमा मला थांबवू शकत नाही.’

 

प्रियंका चोपडा पूर्वी माहिरा खान आणि रणबीर कपूर हे सुद्धा परदेशातील एका हॉटेलमध्ये सिगारेट ओढतांना दिसले होते आणि सोशल मीडियावर ट्रोल झाले होते.

वर्कफ्रंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रियंका चोपडा लवकरच बॉलिवूडमध्ये परततेय. तिचा ‘स्काय इज पिंक’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. चित्रपटात प्रियंकासोबत फरहान अख्तर आणि झायरा वसीम प्रमूख भूमिकांमध्ये आहे. तर चित्रपटाचं दिग्दर्शन सोनाली बोसनं केलंय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
आई-पतीसोबत सिगारेट पिणारी प्रियंका ट्रोल, अस्थमा कुठे गेला? यूजर्सचा प्रश्न Description: अभिनेत्री प्रियंका चोपडा ही बॉलिवूडमधील अशा सेलिब्रेटींपैकी एक आहे जी नेहमी सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या टार्गेटवर असते. आता प्रियंका पुन्हा एकदा ट्रोल झालीय. कारण एका फोटोमुळे प्रियंका ट्रोल होतेय.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
Bigg Boss Marathi 2: ‘तिकीट टू फिनाले’ टास्क जिंकत 'हे' दोन स्पर्धक फिनालेमध्ये होणार दाखल
Bigg Boss Marathi 2: ‘तिकीट टू फिनाले’ टास्क जिंकत 'हे' दोन स्पर्धक फिनालेमध्ये होणार दाखल
forbes 2019: फोर्ब्स लिस्टमध्ये अक्षय कुमारचा दबदबा, सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांना मागे टाकले
forbes 2019: फोर्ब्स लिस्टमध्ये अक्षय कुमारचा दबदबा, सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांना मागे टाकले
ऐश्वर्या-अभिषेक बच्चनच्या लग्नातील न पहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल 
ऐश्वर्या-अभिषेक बच्चनच्या लग्नातील न पहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल 
[VIDEO]: 'या' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार अभिनेता आमिर आणि सैफ अली खान
[VIDEO]: 'या' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार अभिनेता आमिर आणि सैफ अली खान
Batla House Day 6 collection: जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस सिनेमाला विकडेला सुद्धा चांगला प्रतिसाद
Batla House Day 6 collection: जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस सिनेमाला विकडेला सुद्धा चांगला प्रतिसाद
हिमाचल प्रदेशातील अतिवृष्टीचा 'या' अभिनेत्रीला फटका, सिनेमाची संपूर्ण टीम अडकली
हिमाचल प्रदेशातील अतिवृष्टीचा 'या' अभिनेत्रीला फटका, सिनेमाची संपूर्ण टीम अडकली
[VIDEO] भाबीजी घर पर हैं अभिनेत्री अनिता भाभीचा हॉट डान्स 
[VIDEO] भाबीजी घर पर हैं अभिनेत्री अनिता भाभीचा हॉट डान्स 
Mission Mangal Day 6 collection: मिशन मंगल सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड सुरुच, जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला
Mission Mangal Day 6 collection: मिशन मंगल सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड सुरुच, जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला