Koffee with Karan 7 : कोण आहेत 'ते' दोघे भाऊ? ज्यांना सारा अली खान-जान्हवी कपूर डेट करत होत्या?

बी टाऊन
Updated Jul 15, 2022 | 17:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

Koffee with Karan 7 : कॉफी विथ करणमध्ये यावेळी जान्हवी कपूर आणि सारा अली खान या अभिनेत्रींनी हजेरी लावली आहे. या एपिसोडमध्ये या दोघींनी अनेक गोष्टींचा उलगडा केला.

Sara Ali Khan-Janhvi Kapoor in Koffee With Karan
कॉफी विथ करणमध्ये सारा अली खान-जान्हवी कपूर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कॉफी विथ करणमध्ये सारा अली खान-जान्हवी कपूर स्पेशल गेस्ट
  • जान्हवी आणि साराने कोणाला केले डेट?
  • कॉफी विथ करणमध्ये अनेक गोष्टी उलगडल्या

Koffee with Karan 7 : कॉफी विथ करणमध्ये यावेळी जान्हवी कपूर आणि सारा अली खान या अभिनेत्रींनी हजेरी लावली आहे. या एपिसोडमध्ये या दोघींनी अनेक गोष्टींचा उलगडा केला. यावेळी करण जोहर म्हणाला, 'कोविडच्या आधी तुम्ही एकमेकांच्या घट्ट मैत्रिणी होतात हे मला माहित आहे. पण, आज तुमची मैत्री कोणत्या स्तरावर आहे हे मला माहीत नाही. मात्र, भूतकाळात तुम्ही दोघींनी 2 भावांना डेट केले आहे. आम्हा तिघांमध्ये जो बंध निर्माण झाला तो म्हणजे ती दोन मुलं माझ्याच इमारतीत राहायची. करणचे म्हणणे ऐकून सारा आणि जान्हवीला धक्का बसल्याचं या एपिसोडमध्ये पाहायला मिळत आहे.


कॉफी विथ करण 7 चा दुसरा एपिसोड सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.  या एपिसोडमध्ये बॉलिवूडची तरुण दिवा सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांनी धमाल केलेली आहे. या एपिसोड दरम्यान, दोघींनी त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले. यासोबतच दोघींनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रेम आणि प्रवासाबद्दलही सांगितले आहे. 

अधिक वाचा : अनुपम खेर यांना आगामी चित्रपटासाठी द्यावे लागले हे बलिदान


जान्हवी-साराने दोन भावांना डेट केले  


जान्हवी कपूर आणि सारा अली खान चांगल्या मैत्रिणी आहेत. दोघींनी एकत्र ट्रीपसुद्धा केलेली आहे. करण जोहरने त्याच्या शोमध्ये खुलासा केला की दोन्ही अभिनेत्रींनी 2 भावांना डेट देखील केले आहे. करण जोहर म्हणाला, 'कोविडच्या आधी तुम्ही एकमेकांच्या घट्ट मैत्रिणी होतातहे मला माहित आहे. पण, आज तुमची मैत्री कोणत्या स्तरावर आहे हे मला माहीत नाही. मात्र, भूतकाळात तुम्ही दोघींनी 2 भावांना डेट केले आहे. आम्हा तिघांमध्ये जो बंध निर्माण झाला तो म्हणजे ती दोन मुलं माझ्याच इमारतीत राहायची. करणचे म्हणणे ऐकून सारा आणि जान्हवीला धक्का बसला. 


आता करणच्या या खुलाशानंतर सर्वांना जाणून घ्यायचे आहे की ते दोघे भाऊ कोण आहेत. ते दोन भाऊ कोण होते हेही अनेक चाहत्यांनी शोधून काढले आहे. 
सोशल मीडियावरही दोघांची चर्चा सुरू झाली आहे. हे दोघे पहारिया भाऊ असल्याचे यूजर्सचे म्हणणे आहे. जान्हवी आणि सारा वीर पहारिया आणि शिखर पहारियाला डेट करत होत्या. 

अधिक वाचा : 'मी गद्दारी केली नाही, राजीनामा अजिबात देणार नाही'


पहारिया बंधू कोण आहेत? 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by veersara (@veerandsara)


जान्हवी कपूर आणि सारा अली खानचे पहारिया ब्रदर्ससोबतचे अनेक फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. साराने वीरला डेट केले होते, तर जान्हवी शिखरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. एकेकाळी त्यांच्या नात्याबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या आणि फोटो व्हायरल झाले होते. या दोन्ही अभिनेत्रींनी याबाबत काहीही सांगितले नसले तरी. 

अधिक वाचा : मुलांच्या मानसिक विकासासाठी वेळीच लावा सवयी

वीर आणि शिखर हे एका मोठ्या आणि राजकीय कुटुंबातील आहेत. दोघांच्या वडिलांचे नाव संजय पहारिया असून ते बिझनेसमन आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे हे त्यांचे आजोबा आहेत. आईचे नाव स्मृती पहारिया. वीर २८ वर्षांचा आहे आणि त्याने दुबईत आपले शिक्षण पूर्ण केले शिखरचे वय २३ आहे. दोघा भावांनी 2018 मध्ये इंडियाविन या गेमिंग आणि मनोरंजन ही वेबसाईट जॉईन केली आहे. 

या चित्रपटांमध्ये दिसणार अभिनेत्री 

करिअरबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूर तिचा 'गुड लक जेरी' चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहे. दुसरीकडे, सारा अली खान विक्रांत मॅसीसोबत आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर विकी कौशलसोबत 'गॅसलाइट' चित्रपटात दिसणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी