RRR success party : RRRच्या सक्सेस पार्टीत राखी सावंतला कोणी दिली अपमानास्पद वागणूक? नक्की काय आहे प्रकरण, वाचा ही बातमी

बी टाऊन
Updated Apr 08, 2022 | 22:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

RRR success party : राजामौली यांच्या आरआरआर या सिनेमाने नुसता धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत 1000 कोटींहून अधिक कमाई या सिनेमाने जगभरात केलेली आहे. त्याचीच सक्सेस पार्टी नुकतीच मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या सक्सेस पार्टीत राखी सावंतला चुकीची वागणूक दिल्याचं सोशल मीडियावर म्हटलं गेलं आहे. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया.

Who insulted Rakhi Sawant at RRR's success party?
मुंबईत रंगली आरआरआरची सक्सेस पार्टी  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • मुंबईत रंगली आरआरआरची सक्सेस पार्टी
  • पार्टीला सिनेमाची टीम उपस्थित होती
  • सक्सेस पार्टीत राखी सावतंला मिळाली चुकीची वागणूक?

RRR success party : राम चरण, ज्युनियर एनटीआर, अजय देवगण, आलिया भट्ट स्टारर आरआरआर हा सिनेमा सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. या सिनेमाने जगभरात आतापर्यंत तब्बल 1000 कोटींचा गल्ला कमावला आहे. सिनेमातील व्हिज्युअल इफेक्ट्सने साऱ्यांनाच थक्क केले आहे. नुकतीच या सिनेमाची सक्सेस पार्टी मुंबईत पार पडली. या सक्सेस पार्टीत सिनेमातील साऊथ सुपरस्टार्ससह बॉलिवूडच्या कलाकारांनीही हजेरी लावली होती. मग राखी सावंत तरी मागे कशी राहिल? राखीने आपल्या खास अंदाजात सिनेमाच्या सक्सेस पार्टीला हजेरी लावली. 

इतकचं करून थांबेल तर ती राखी सावंत कसली, तिने थेट व्हिडिओ शुटिंगचं सुरू केलं. यावेळी राखी एकएक करून सिनेमातील कलाकारांशी बोलत होती. राखी सावंत पहिल्यांदा राम चरणशी बोलते. ती कॅमेरा त्याच्याकडे दाखवते आणि म्हणते- 'मी कुठे आहे, माझा आवडता हिरो...' राखीची प्रतिक्रिया ऐकून साऊथ सुपरस्टार राम चरणही स्माईल देतो. त्यानंतर अयान मुखर्जीही राखीला स्माईल देत पुढे जातो. मग राखी सावंतचा मोर्चा वळतो तो थेट दिग्दर्शक करण जोहरकडे. यावेळी राखी करणशी बोलण्याचा प्रयत्न करते. मात्र, करण त्याचवेळी दुसऱ्याकोणाशी बोलत असल्याने राखीशी बोलू शकत नाही. त्यामुळे राखी म्हणते 'माफ करा मी यापलीकडे काही करू शकत नाही, मी खूप उत्साहित आहे. 'मग राखी ज्युनिअर एनटीआरशी सुद्धा बोलते. 

अधिक वाचा : ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना वजन कमी करण्यासाठी देणार बोनस

मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होताच राखी सावंतचे चाहते भडकले आहेत. करण जोहरने राखीला अपमानास्पद वागणूक दिल्याची प्रतिक्रिया तिचे चाहते देत आहेत. या घटनेमुळे करण जोहर ट्रोल झालेला आहे. आता चाहते जरी अशी प्रतिक्रिया देत असले तरी राखी मात्र, करण जोहरच्या बाजूनेच बोलताना दिसत आहे. 

अधिक वाचा : घरी आलेल्या पाहुण्याला विचारू नका या गोष्टी, होईल नुकसान

करण जोहर त्यावेळी ज्युनिअर एनटीआरशी बोलत असल्याने आपल्याशी बोलू शकला नसल्याचं राखीचं म्हणणं आहे. शेवटी काय बॉलिवूडमध्ये कधी कोण कोणाची बाजू घेईल, कोणाला समर्थन देईल काही सांगता येत नाही. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी