सॅम बॉम्बे कोण आहे? पूनम पांडेच्या पतीबद्दल या गोष्टी तुम्हांला माहिती आहे का 

poonam pandey's husband sam bombay : पूनम पांडेने अलीकडेच तिचा नवरा सॅम बॉम्बे यांच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप केल्यानंतर ट्रेंडच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.

who is sam bombay all you need to know about poonam pandeys husband
सॅम बॉम्बे कोण आहे? पूनम पांडेच्या पतीबद्दल सर्व काही  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मुंबई पोलिसांनी 8 नोव्हेंबर रोजी सॅमला अटक केली होती.
  • पूनमच्या डोक्याला, डोळ्याला आणि चेहऱ्याला दुखापत झाल्याने तिला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
  • अभिनेत्रीने पतीवर गंभीर आरोप करण्याची ही दुसरी वेळ आहे. तेव्हापासून सोशल मीडियावर त्याच्याबद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे.

sam bombay । पूनम पांडेने अलीकडेच तिचा नवरा सॅम बॉम्बे यांच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप केल्यानंतर ट्रेंडच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. मुंबई पोलिसांनी 8 नोव्हेंबर रोजी सॅमला अटक केली होती. पूनमच्या डोक्याला, डोळ्याला आणि चेहऱ्याला दुखापत झाल्याने तिला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्रीने पतीवर गंभीर आरोप करण्याची ही दुसरी वेळ आहे. तेव्हापासून सोशल मीडियावर त्याच्याबद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे. पूनम पांडेचा नवरा सॅम बॉम्बे बद्दल आम्ही तुम्हांला सर्व माहिती सांगणार आहोत. (who is sam bombay all you need to know about poonam pandeys husband)


सॅम बॉम्बे कोण आहे?

27 जानेवारी 1984 रोजी दुबई येथे जन्मलेला सॅम अहमद बॉम्बे हे हिंदी चित्रपटसृष्टीतील असून ते दिग्दर्शक, निर्माता आणि संपादक आहेत. चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याची त्यांची लहानपणापासूनची आवड होती. दुबईतील जेबेल अली स्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी दुबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. सध्या सॅम मुंबईत राहतो.

कामाच्या आघाडीवर

सॅम बॉम्बे यांनी VMLY&R या विपणन संप्रेषण कंपनीमध्ये प्रादेशिक कार्यकारी क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम केले आहे. त्याने दीपिका पदुकोण, तमन्ना भाटिया, अल्लू अर्जुन आणि युवराज सिंग यांसारख्या सेलिब्रिटींसोबत जाहिरात-चित्रपट निर्माता म्हणूनही काम केले आहे. सॅमने बेफिक्रा दिग्दर्शित केला, टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांचा समावेश असलेला रोमँटिक संगीत व्हिडिओ. त्याने विद्युत जामवाल आणि उर्वशी रौतेला स्टारर म्युझिक व्हिडिओ गल बन गईचे दिग्दर्शनही केले.

सॅमचे पहिले लग्न

पूनम पांडेच्या आधी सॅम बॉम्बेचे लग्न मॉडेल एली अहमदशी झाले होते. एलीकडून सॅमला दोन मुले आहेत - मुलगा ट्रॉय बॉम्बे आणि मुलगी टिया बॉम्बे.

पूनम पांडे आणि सॅम बॉम्बेचे लग्न

पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे यांनी 10 सप्टेंबर 2020 रोजी मुंबईत एका खाजगी समारंभात लग्न केले. वांद्रे येथील पूनमच्या बंगल्यावर लग्न करण्यापूर्वी ते तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनीही आता इन्स्टाग्रामवरून त्यांच्या लग्नातील फोटो हटवले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी