Sara ali khan : सारा अली खान कोणाला करतेय डेट? तिच्या बॉयफ्रेण्डची मालमत्ता किती आहे हे जाणून घ्या.

बी टाऊन
Updated Jan 08, 2022 | 15:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sara Ali khan's boyfriend net worth : सारा अली खान सध्या खूपच चर्चेत आहे. सारा बॉलिवूडमधील एका सहाय्यक दिग्दर्शकाला डेट करत असल्याची चर्चा आहे. तिच्या या बॉयफ्रेण्डची मालमत्ता किती आहे जाणून घ्या.

Who is Sara Ali Khan dating? Find out how much her boyfriend owns.
सारा अली खानच्या बॉयफ्रेण्डची मालमत्ता किती आहे ?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जेहान हांडा आहे सारा अली खानचा बॉयफ्रेण्ड
  • सहाय्यक दिग्दर्शक आहे जेहान हांडा
  • सारा आणि जेहान रिलेशनशिपमध्ये असल्याची बी टाऊनमध्ये चर्चा

Sara ali khan's boyfriend net worth : सैफ अली खान हे इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. लोकांना ते खूप आवडते. बॉलिवूड इंडस्ट्रीत त्याला छोटे नवाब म्हणून ओळखले जाते, याचे कारण म्हणजे सैफ अली खान राजघराण्यातील आहे. यामुळेच सैफ आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाची जीवनशैली राजेशाही आहे. सैफ आणि त्याचे कुटुंब कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

सैफ अली खान सध्या मुलगी सारा अली खानमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. सारा अली खान ही सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांची मुलगी आहेसारा अली खान सध्याच्या काळातील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सध्या सारा अली खान तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सारा अली खान बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध व्यक्तीला डेट करत आहे. त्यामुळेच तिची सध्या बरीच चर्चा आहे. साराच्या या नात्यामुळे तिचे वडील सैफही सध्या चर्चेत आहेत.

सारा अली खान कोणाला डेट करत आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल? तिच्या या मित्राचे नाव काय? साराचा हा मित्र सहाय्यक दिग्दर्शक आहे.
चला तर मग जाणून घेऊया कोण आहे सारा अली खानचा हा खास दोस्त कोण आहे हे. 

सारा अली खान या व्यक्तीला डेट करत आहे


सारा अली खान बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव बनले आहे. सारा अली खानने आपल्या फिल्मी करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मात्र, आजकाल ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. कारण आजकाल सारा अली खानच्या बॉयफ्रेंडची माहिती समोर आली आहे ज्याला ती सध्या डेट करत आहे.

बातमीनुसार, सारा अली खानच्या बॉयफ्रेंडचे नाव जेहान हांडा आहे. सारा अली खान अनेक दिवसांपासून जेहानसोबत दिसत आहे. दोघेही एकमेकांना खूप पसंत करतात अशीही बातमी आहे. केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सारा अली खान आणि जेहान यांची भेट झाली होती. या चित्रपटात जेहान सहाय्यक दिग्दर्शक होता.

Is Sara Ali Khan dating her 'Kedarnath' AD Jehan Handa? Check out their recent photo and video here! | Hindi Movie News - Times of India


सध्या बॉलिवूडमध्ये सारा अली खानच्या प्रेमकहाणीची जोरदार चर्चा सुरू आहे. जेहान बॉलीवूडमधील एक मोठे नाव आहे. जेहान आणि सारा अली खानची प्रेमकहाणी केदारनाथ या चित्रपटापासून सुरू झाली होती ज्यामध्ये जेहान सहाय्यक दिग्दर्शक होता.या चित्रपटापासून दोघे अनेकदा एकत्र दिसत आहेत, त्यामुळे सारा अली खान जहांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. मालमत्तेबद्दल सांगायचे झाले तर, 250 कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे जेहान. मात्र, सारा अली खानने अद्याप जेहानसोबत डेट करण्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी