Vikram Vedha Shooting: विक्रम वेधाच्या शूटिंगनंतर राधिका आपटे का रडली? हृतिक-सैफसोबतच्या शूटिंगचा सांगितला अनुभव

बी टाऊन
Updated Jun 13, 2022 | 19:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vikram Vedha Shooting: राधिका आपटेने हृतिकसोबत काम करण्याचा तिचा अनुभव शेअर केला. विक्रम वेधा हा ब्लॉकबस्टर तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे

Why did Radhika Apte cry after Vikram Vedha's shooting?
विक्रम वेधाच्या शूटिंगनंतर राधिका आपटे का रडली?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राधिका आपटेने शेअर केला विक्रम-वेधाच्या शूटिंगचा अनुभव
  • विक्रम वेधा ब्लॉकबस्टर तामिळ सिनेमाचा रिमेक आहे
  • सैफ आणि हृतिकसोबतचा अनुभव शेअर केला

Vikram Vedha Shooting: राधिका आपटेने ओटीटीवर आतापर्यंत इतके प्रोजेक्ट केले आहेत की तिच्या चाहत्यांनी तिला 'क्वीन ऑफ ओटीटी'चा टॅग द्यायला सुरुवात केली आहे. आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर राधिका लवकरच हृतिक रोशन आणि सैफ अली खानसोबत 'विक्रम वेधा' या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. अलीकडेच सैफ अली खान आणि हृतिक रोशन एकत्र शूटिंग करतानाचे फोटो समोर आले आहेत. परंतु या चित्रपटातील राधिका आपटेचा लूक अद्याप समोर आलेला नाही.


सैफ अली खानसोबतचा हा तिसरा प्रोजेक्ट आहे

राधिका आपटेने अलीकडेच तिचा हृतिक रोशन आणि सैफ अली खानसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. राधिका आपटेने यापूर्वी सैफ अली खानसोबत नेटफ्लिक्सची सुपरहिट वेब सीरिज 'सेक्रेड गेम्स' आणि 'बाजार' या चित्रपटात काम केल्याची माहिती आहे. 'विक्रम वेधा' हा तिचा सैफ अली खानसोबतचा तिसरा प्रोजेक्ट असेल ज्यासाठी राधिका खूप उत्सुक आहे.


शूटिंग संपल्यानंतर राधिका आपटे का रडली? 

'विक्रम वेधाचे  शूट संपले आहे. सैफ अली खान आणि माझा हा तिसरा प्रोजेक्ट आहे. मला त्याच्यासोबत काम करायला आवडते, मला तो खूप मजेदार वाटतो.मी सेटवर फक्त हसत राहते. याशिवाय दिग्दर्शक पुष्कर-गायत्री खूप दयाळू आहेत.माझे शूट संपल्यानंतर मी अक्षरशः रडले. ‘विक्रम वेधा’च्या शूटिंगमध्ये मी खूप छान वेळ एन्जॉय केला. 


हृतिक रोशनसोबतचा अनुभव कसा होता

राधिका आपटेने हृतिक रोशनसोबत काम करण्याचा तिचा अनुभव शेअर केला. ती म्हणाली, 'मी त्याच्याशी अनेक गोष्टींबद्दल बोलले. तो खूप चांगला आहे. मी पण त्याच्यासोबत खूप वेळ घालवला आहे. विक्रम वेधा हा ब्लॉकबस्टर तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी