Bollywood News of Sonakshi Sinha, मुंबई : सोनाक्षी सिन्हाने 2010 साली दबंग या चित्रपटातून बॅालिवूड मध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती सलमान खानसह दिसली होती आणि याच चित्रपटाने तिला प्रसिद्धी मिळली त्यानंतर हळूहळू ती मोठ्या पडद्यावर दिसू लागली.
त्याचवेळी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षी सिन्हाने पहिल्यांदाच तिचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि अभिनेत्री रीना रॉय यांच्या अफेअरबद्दल बोलली.
सोनाक्षी म्हणाली की, तिला असे वाटते की तिचे वडील आणि रीना रॉय यांच्यातील अफेअर ती जन्मालाही आली नव्हती तेव्हा होते, जेव्हा मी मोठी होत होती तेव्हा मला कळले आणि मग मला सर्वकाही समजू लागले होते.
ती पुढे म्हणाली की, तिच्या वडिलांनी जे काही अनेक वर्षांपूर्वी केले होते, त्याबद्दल मी त्यांना काही विचारु शकत नाही. सोनाक्षीचा असा विश्वास आहे की, हा तिच्या वडिलांचा भूतकाळ आहे आणि प्रत्येकाचा भूतकाळ असतो.
सोनाक्षी पुढे म्हणाली की, ती याबद्दल फारसा विचार करत नाही आणि तिला याकडे लक्ष द्यायचे नाही. ती पुढे म्हणाली की, यातून काही लोकांना चांगले विषय मिळतील. तसेच यामुळे काहींना गॉसिपला विषय होईल, परंतु हे माझे कुटुंब आहे.
दुसरीकडे, जेव्हा सोनाक्षी सिन्हाला विचारले गेले की, तिचा चेहरा रीना रॉयसारखा का आहे, तेव्हा अभिनेत्री म्हणाली की तिला वाटते की, तिचा चेहरा तिची आई पूनम सिन्हा सारखा आहे. रीना रॉय यांच्याशी कोणतेही साम्य स्वीकारण्यास तीने नकार दिला. ती म्हणाली, 'मला वाटते की मी माझ्या आईसारखी दिसते (पूनम सिन्हा).'
दुसरीकडे, एका मुलाखतीत जेव्हा हाच प्रश्न रीना रॉय यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनाही निव्वळ योगायोग असल्याचे सांगितले, कधी कधी असे घडते. यासाठी जितेंद्रची आई आणि त्याची आई यांची तुलना करताना त्यांनी दोन्ही जुळी मुलं वाटू लागतात असं म्हटलं होतं.
सोनाक्षी गेल्या 13 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. दुसरीकडे, वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सोनाक्षी सिन्हा नुकतीच 'डबल एक्सल' चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिच्यासोबत अभिनेत्री हुमा कुरेशी देखील दिसली होती, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही करिश्मा दाखवू शकला नाही.