Priyanka Chopra- Nick Jonas : प्रियांका चोप्राने का हटविले आपले आडनाव 'जोनास', हे आहे खरे कारण?

Priyanka Chopra Remove Jonas surname । प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) तिच्या नावासमोर जोनास काढून लोकांना आश्चर्यचकित केले आहे. आता ही बातमीही समोर येत आहे की, अभिनेत्रीने शेवटी असं का केलं.

why priyanka chopra removed surname jonas know the reason
प्रियांका चोप्राने का हटविले आपले आडनाव 'जोनास  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • प्रियंका चोप्राने जोनास आडनाव का काढले?
  • खरं कारण आले समोर
  • शो संबंधित आहे हे सर्व प्रकरण 

Priyanka Chopra- Nick Jonas । नवी दिल्ली : जागतिक अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) तिच्या नावासमोरून 'जोनास' हे आडनाव काढून टाकले असून, हे पाऊल उचलल्यानंतर ती अभिनेत्री आता चर्चेत आली आहे. प्रियांका आणि निकचा घटस्फोट (Priyanka Nick Divorce) तर होत नाही ना असे  चाहत्यांना वाटते आहे. पण आता एक कारण समोर येत आहे की, अभिनेत्रीने इतका मोठा निर्णय का घेतला. (why priyanka chopra removed surname jonas know the reason )

प्रियांकाने का काढले तिचे आडनाव?

प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra)लग्नानंतर तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या नावासमोर 'जोनास' जोडले होते, मात्र सोमवारी तिने अचानक 'जोनास' हे आडनाव काढून टाकले. आता अभिनेत्रीने असे का केले असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.  जर तुम्हालाही या प्रश्नाची चिंता सतावत असेल, तर एक कारण समोर आले असून याच कारणामुळे अभिनेत्रीने हे पाऊल उचलले असावे, असे मानले जात आहे.

जोनास भावांचा येतोय शो

प्रियंका चोप्राचा (Priyanka Chopra)पती निक जोनासने (Nick Jonas) नुकतीच एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये तो एका शोबद्दल सांगत आहे. हा शो नेटफ्लिक्सवर आज म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे आणि त्याच्या एक दिवस आधी प्रियांकाचे आडनाव काढून टाकणे हे सूचित करत आहे की तिने पती निक जोनासला चर्चेत आणण्यासाठी हे केले असावे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nick Jonas (@nickjonas)


शो आज होईल रिलीज

जेव्हा जेव्हा जोनास ब्रदर्सच्या(Jonas Brothers) प्रोजेक्टचा विचार केला जातो तेव्हा प्रियांका खूप सक्रिय असते. याआधी प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्टद्वारे जोनास ब्रदर्स फॅमिली रोस्टची जाहिरात केली आहे. प्रियांका, तरीही, तिचे आडनाव काढून टाकल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आली आहे आणि असे दिसते आहे की तिला आपल्या पतीची जाहिरात करायची होती, ते काम पूर्ण झाले आहे.

प्रियांकाही या शोमध्ये सहभागी झाली 

आम्ही तुम्हाला सांगतो, जोनास ब्रदर्स फॅमिली रोस्टचा (Jonas Brothers Family Roast)प्रीमियर नेटफ्लिक्सवर आज म्हणजेच २३ नोव्हेंबरला होणार आहे. या शोमध्ये प्रियंका चोप्रा Priyanka Chopra) तिची वहिनी आणि हॉलिवूड स्टार्स सोफी टर्नर (Sophie Turner)आणि केविन जोनास  (Kevin Jonas) यांच्या पत्नीसह सहभागी झाली आहे. आता बघूया त्याचा शो कितपत हिट ठरतो आणि प्रियांकाची ही बाजी कितपत यशस्वी ठरते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी