Ranbeer and Alia wedding plan : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या महिन्यात लग्न करणार?, जाणून घ्या लग्नाच्या ठिकाणाची माहिती

बी टाऊन
Updated Apr 03, 2022 | 09:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ranbir Kapoor and Alia Bhatt wedding Confirmed? : यापूर्वी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट राजस्थानच्या उदयपूरमध्ये लग्न करणार असल्याची बातमी आली होती. पण आता या जोडप्याच्या वेडिंग लोकेशनचे लेटेस्ट अपडेट आले आहे.

Will Ranbir Kapoor and Alia Bhatt get married this month ?
रणबीर-आलियाच्या लग्नाची तारीख ठरली?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नासाठी आता आणखी प्रतीक्षा करावी लागणार नाही.
  • रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अखेर लग्नबंधनात अडकणार आहेत.
  • आलिया-रणबीर कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत सात फेरे घेणार आहेत.

Ranbir Kapoor and Alia Bhatt wedding: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या आवडत्या बॉलीवूड जोडप्याच्या लग्नासाठी आता प्रतीक्षा करावी लागणार नाही. कारण प्रतीक्षेची वेळ संपली आहे आणि आता अखेर रणबीर-आलियाच्या लग्नाची सनई वाजण्यासाठी सज्ज झाली आहे. होय, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या बातम्या आपण खूप दिवसांपासून ऐकत आहोत, पण आता नाही कारण आता ही खरोखर चांगली बातमी आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अखेर लग्नबंधनात अडकणार आहेत. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे हे लग्न एप्रिलमध्येच होणार असल्याचं म्हटलं जात आहे. या लग्नात आलिया-रणबीर कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत सात फेरे घेणार आहेत.


रणबीर आणि आलिया एप्रिलच्या मध्यात लग्न करणार आहेत

बॉलिवूडच्या मचअवेटेड जोडप्याचं लग्न अखेर आता लवकरच होणार आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच पती-पत्नी म्हणू समोर येणार आहेत. सूत्रानुसार, रणबीर आणि आलिया एप्रिल, २०२२ मध्ये विवाह बंधनात अडकणार आहेत. एक प्राइवेट सेरेमनी मध्ये काही जवळचे कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत हे लग्न बंधनात अडकणार आहेत. 

यापूर्वी, रणबीर आणि आलियाच्या जवळच्या एका सूत्राने खुलासा केला होता की त्यांनी लग्नाची तारीख निश्चित केली आहे. रणबीर आणि आलिया एप्रिल 2022 मध्ये लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. अलीकडेच रणबीरची आई नीतू कपूर सेलिब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्राच्या स्टोअरमध्ये स्पॉट झाली होती आणि त्याचप्रमाणे मनीष देखील त्याच्या घरी वारंवार स्पॉट झाला आहे. लग्नाआधीच या जोडप्याने त्यांच्या चित्रपटांचे शूटिंग पूर्ण केले आहे.

कुठे होणार रणबीर-आलियाचं लग्न?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील चेंबूर येथील आरके हाऊसमध्ये विवाहसोहळा पार पडण्याची शक्यता आहे. तर याआधी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट राजस्थानच्या उदयपूरमध्ये लग्न करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता सूत्रांचे म्हणणे आहे की कुटुंबीयांना लग्न मुंबईतच ठेवायचे आहे.


रणबीर आणि आलियाच्या वर्क कमिटमेंट्स

दरम्यान, वर्क फ्रंटवर, आलिया भट्ट अलीकडे ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्यासोबत आरआरआरमध्ये दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. यानंतर ती तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत ब्रह्मास्त्रमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे.अभिनेत्रीकडे डार्लिंग्स, रॉकी आणि राणीची प्रेमकथा हे सिनेमा आहेत.  दुसरीकडे, रणबीर शमशेरामध्ये वाणी कपूर आणि संजय दत्तसोबत दिसणार आहे. अभिनेत्याकडे अॅनिमल, लव रंजनच्या विरुद्ध श्रद्धा कपूरचा एक शीर्षकहीन चित्रपट आहे आणि तो ब्रह्मास्त्रच्या रिलीजसाठी देखील उत्साहित आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी