Woman alleges foul play in Satish Kaushik death over Rs 15 crore dispute : बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी माझ्या पतीला 15 कोटी रुपये कर्ज म्हणून दिले होते. ही रक्कम पतीने कौशिक यांना परत केली नव्हती. याच मुद्यावरून सतीश कौशिक आणि माझे पती यांच्यात वाद सुरू होता. पैसे परत करण्याची वेळ येऊ नये यासाठी माझ्या पतीनेच औषध देऊन सतीश कौशिक यांना संपवले असा आरोप एका महिलेने स्वतःच्या पतीवर केला आहे. महिलेने तिचे म्हणणे पोलिसांना सांगितले आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
सतीश कौशिक यांनी पतीला 15 कोटी रुपये दिले पण त्याचा पुरावा माझ्याकडे याक्षणी नाही. या पैशांवरून सुरू असलेला वाद संपत नव्हता. कोरोना संकटात नुकसान झाले आणि पैसे गमावले. आता सतीशपासून सुटका करून घेणे आवश्यक आहे असे माझे पती बोलल्याचेही संबंधित महिलेने पोलिसांना सांगितले. पतीने मित्रांच्या मदतीने सतीश कौशिक यांची औषध देऊन हत्या केली असा आरोप संबंधित महिलेने केला आहे.
'सतीश कौशिक 23 ऑगस्ट 2022 रोजी आमच्या दुबईच्या घरी आले होते. त्यावेळी सतीश कौशिक आणि माझे पती यांच्यात 15 कोटी रुपयांवरून वाद झाला होता. मी ड्रॉईंग रुममध्ये उपस्थित होते. मी तुला तीन वर्षांपूर्वी गुंतवणुकीसाठी 15 कोटी रुपये दिले होते, असे सतीश कौशिक माझ्या पतीला म्हणाले. माझे पैसे ना कुठे गुंतवण्यात आले, ना ते मला परत करण्यात आले. माझी निव्वळ फसवणूक करण्यात आली, असं सतीश कौशिक त्यावेळी म्हणाले होते,' असा उल्लेख महिलेनं दाखल केलेल्या तक्रारीत आहे.
सतीश कौशिक यांच्या मृत्यूची बातमी वाचल्यानंतर महिलेने पोलिसांशी संपर्क साधला आहे. तिने पोलिसांना दुबईच्या एका पार्टीत काढण्यात आलेला सतीश कौशिक आणि पतीचा फोटो पण दाखवला. या पार्टीला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मुलगा उपस्थित होता, असेही महिलेने सांगितले.
सतीश कौशिकच्या अंत्यसंस्काराला गैरहजर होते हे 10 मित्र
आगीत जळून खाक झाले या टीव्ही मालिकांचे सेट
मृत्यूच्या दाढेतून परतलेले सेलिब्रेटी