Yuzvendra Chahal's Wife Dhanashree Verma Photoshoot : यजुवेंद्र चहलची पत्नी धनश्रीची गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात कातिल अदा, फोटोने सर्वाना घातली भुरळ

बी टाऊन
Updated May 07, 2022 | 15:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

Yuzvendra Chahal's Wife Dhanashree Verma Photoshoot : यजुवेंद्र चहलचे नाव आयपीएलमुळे चर्चेत येत आहे, तर दुसरीकडे त्याची पत्नी धनश्री वर्मा तिच्या बॅक टू बॅक ग्लॅमरस अवताराने इंटरनेटवर अधिराज्य गाजवत आहे. यावेळी तिने तिच्या लेटेस्ट फोटोशूटशी संबंधित फोटो शेअर केले.

Yajuvendra Chahal's wife Dhanashree's killer Ada in pink lehenga
यजुवेंद्र चहलच्या बायकोची कातिल अदा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • यजुवेंद्र चहलच्या बायकोची कातिल अदा
  • गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात धनश्रीचा जलवा
  • धनश्री वर्माचं फोटोशूट व्हायरल

Yuzvendra Chahal's Wife Dhanashree Verma Photoshoot : यजुवेंद्र चहलचे नाव आयपीएलमुळे चर्चेत येत आहे, तर दुसरीकडे त्याची पत्नी धनश्री वर्मा तिच्या बॅक टू बॅक ग्लॅमरस अवताराने इंटरनेटवर अधिराज्य गाजवत आहे. यावेळी तिने तिच्या लेटेस्ट फोटोशूटशी संबंधित फोटो शेअर केले. त्यामुळे लोकांनी तिच्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. धनश्री बहुतांशी वेस्टर्न कपड्यांमध्ये दिसत असली तरी यावेळी तिने गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान करून शूट केले. या देसी अवतारात तिच्या सौदर्याने साऱ्यांनाच घायाळ केले. 


सिल्कच्या लेहेंग्याने वाढवली नजाकत


फोटोंमध्ये धनश्रीने सिल्क टूल, टूल आणि रॉ-सिल्कपासून बनवलेला लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे. या कपड्यांवर लाल आणि गुलाबी रंगाचं क्लिष्ट भरतकाम करण्यात आले आहे. लेहेंग्याच्या तळाला  ए-लाइन फ्लेर्ड स्कर्ट आणि वर प्लंगिंग नेकलाइन ब्लाउज होता. कोरल गुलाबी रंगाचा लेहेंगा मोनिका आणि करिश्माच्या Z लेबलवरून घेतला होता.


गळ्यात घातलेला हेवी नेकलेस

धनश्रीने लेहेंग्यासह हेवी चोकर नेकलेस परिधान केला होता. हा स्टेटमेंट पीस ब्लाउजच्या नेकलाइनला आणखी हायलाइट करत होता. धनश्री चहलचा मेकअप नैसर्गिक टोनमध्ये ठेवण्यात आला होता, तर तिचे केस बनमध्ये बांधले होते. हा लेहेंगा सेट परिधान करून धनश्री एखाद्या मॉडेलपेक्षा कमी दिसत नव्हती.


यजुवेंद्रला चीअर करण्यासाठी ग्राऊंडवर शॉर्ट ड्रेस घालून पोहोचली

यापूर्वी या सेलिब्रिटी पत्नीने आयपीएल सामन्यापूर्वी स्टेडियममधील तिचे फोटो सर्वांसोबत शेअर केले होते. पतीला चिअर करण्यासाठी आलेल्या धनश्रीने कॉलर नेकलाइन शॉर्ट ड्रेस घातला होता, ज्यासोबत तिने  इटालियन लक्झरी फॅशन हाउस मोस्चिनोचा बेल्ट घातला होता. यामुळे तिच्या लूकची स्टाइल आणखी वाढली होती.


नूडल स्ट्रॅपच्या गुलाबी टॉपमध्ये धनश्रीची कातिल अदा

धनश्रीच्या या फोटोंनी चांगलीच चर्चा रंगवली होती. सामना पाहण्यासाठी आलेल्या या महिलेने निळ्या शेडची जॉगर स्टाइल जीन्स परिधान केली होती. यासह, तिने चमकदार गुलाबी रंगाचा नूडल स्ट्रॅप टॉप घातला होता. धनश्रीने लेदर मेड स्नीकर्स आणि स्टायलिश शेड्ससह तिचा मस्त आणि सेक्सी लुक दिसत होता. तिच्या शूजमध्येही टॉपशी मॅच होणारा गुलाबी रंग दिसत होता.


ग्लॅमरस लुकसह धनश्रीचा हॉट लूक

धनश्रीचे हे फोटोशूटही खूप चर्चेत आले होते. या फोटोंमध्ये ती ग्लॅमरस लूकमध्ये दिसली होती. फोटोंमध्ये, धनश्रीने पेस्टल ब्लू कलरचा स्लिट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी