विवाहानंतर समोर आले यामी गौतमचे पहिले छायाचित्र, भांगेत कुंकू आणि हातात चुड्यासह दिसली अभिनेत्री

बी टाऊन
Updated Jun 06, 2021 | 14:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

फेअर अँड लव्हलीच्या जाहिरातींमधून आणि उरी: द सर्जिकल स्ट्राइक अशा गाजलेल्या चित्रपटांमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री यामी गौतम हिने नुकतीच आदित्य धरशी लग्नगाठ बांधली. आता लग्नानंतरचे तिचे फोटो समोर आले आहेत.

Yami Gautam
यामी गौतम  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • आदित्य धरशी यामी गौतमने बांधली लग्नगाठ
  • हिरव्या साडीत दिसली नववधू यामी गौतम
  • यामीने सोशल मीडियावर केले लग्नाचे फोटो

नवी दिल्ली : फेअर अँड लव्हलीच्या (Fair and Lovely) जाहिरातींमधून (advertisements) आणि उरी: द सर्जिकल स्ट्राइक (Uri: The Surgical Strike) अशा गाजलेल्या चित्रपटांमधून (films) लोकप्रिय (famous) झालेली अभिनेत्री (actress) यामी गौतम (Yami Gautam) हिने नुकतीच आदित्य धरशी (Aditya Dhar) लग्नगाठ (marriage) बांधली. त्या दोघांचा विवाहसोहळा (marriage function) फार गुप्तपणे (secretly) हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh) मंडी जिल्ह्यातील गोहर गावात पार पडला. आता लग्नानंतरचे तिचे फोटो (photos) समोर आले आहेत.

आदित्य धरशी यामी गौतमने बांधली लग्नगाठ

यामी गौतमने लेखक आणि दिग्दर्शक आदित्य धर याच्यासोबत लग्नगाठ बांधल्यानंतर आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले जे भरपूर व्हायरल होत आहेत. तिचे चाहते तिचे अभिनंदन करत आहेत. यामी गौतमच्या या पावलामुळे तिचे चाहते बरेच चकित झाले होते. आता तिच्या लग्नानंतर तिचे पहिले फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.

हिरव्या साडीत दिसली नववधू यामी गौतम

यामीचे हे फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. नववधूच्या रुपात ती या फोटोंमध्ये दिसत आहे. तिने हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. तिच्या हातात लाल चुडा आणि गळ्यात मंगळसूत्र आहे. या फोटोत ती फारच सुंदर दिसत आहे. तिच्या चाहत्यांनी या फोटोवर तिचे अभिनंदन केले आहे आणि या फोटोला लाखो लाईक्स मिळाले आहेत.

यामीने सोशल मीडियावर केले लग्नाचे फोटो

याआधी यामी गौतमच्या हळदीच्या समारंभाचे फोटोही समोर आले होते ज्यात ती पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसली होती.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yami Gautam (@yamigautam)

याआधी यामीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या विवाहाचे फोटो शेअर केले होते आणि लिहिले होते, तुझ्या प्रकाशात मी प्रेम शिकले आहे रूमी! आमच्या कुटुंबियांच्या आशीर्वादाने आम्ही विवाह केला आहे. हा उत्सव आम्ही आमच्या कुटुंबियांच्या साथीने साजरा केला आहे. आम्हाला आपल्या प्रेमाची आणि शुभेच्छांची गरज आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yami Gautam (@yamigautam)

यामीच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांसह अनेक बॉलिवुड सेलिब्रिटीजनीही तिचे अभिनंदन केले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी