Disha Patani: अरे बापरे! ज्या बॅगेमुळे दिशा पटानी ट्रोल होतेय त्या बॅगेची किंमत पाहून तुम्हालाही बसेल धक्का 

बी टाऊन
Updated Apr 29, 2022 | 15:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

Disha Patani Trolled For Her Bag । बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया (Tara Sutaria) यांचा चित्रपट हिरोपंती २ आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तत्पूर्वी, निर्मात्यांनी चित्रपटाचे स्क्रिनिंग आयोजित केले होते जेथे टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानीने देखील हजेरी लावली होती.

You will also be shocked to see the price of the bag being trolled by Disha Patni
दिशा पटानीकडील बॅगेची किंमत पाहून तुम्हालाही बसेल धक्का  
थोडं पण कामाचं
  • हिरोपंती २ आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
  • दिशा चित्रपटाच्या स्क्रिनिंगला प्लंगिंग नेकलाइन लॅव्हेंडर बॉडीकॉन आणि सिल्व्हर हाय हील्स घालून पोहोचली.
  • दिशाची ज्या बॅगेवरून खिल्ली उडवली जात आहे की बॅग खूप महाग आहे.

Disha Patani Trolled For Her Bag । मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि तारा सुतारिया (Tara Sutaria) यांचा चित्रपट हिरोपंती २ (Heropanti 2) आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तत्पूर्वी, निर्मात्यांनी चित्रपटाचे स्क्रिनिंग आयोजित केले होते जेथे टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानीने देखील हजेरी लावली होती. दिशा एका जबरदस्त अवतारात तिथे पोहचली होती. (You will also be shocked to see the price of the bag being trolled by Disha Patni). 

चाहत्यांकडून दिशा ट्रोल

दिशा चित्रपटाच्या स्क्रिनिंगला प्लंगिंग नेकलाइन लॅव्हेंडर बॉडीकॉन आणि सिल्व्हर हाय हील्स घालून पोहोचली आणि तिने तिचे केस उघडे ठेवले होते. मात्र सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे दिशाच्या बॅगची. तिच्या छोट्या बॅगेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. दिशाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी कमेंट करून तिची खिल्ली उडवत आहेत. दिशाच्या या व्हिडिओवर कमेंट करताना युजरने लिहिले की, 'पर्समध्ये काय आहे? पान मसाला पॅकेट?' आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले, 'दिशाच्या हातात कोणते कुलूप आहे, भाऊ? तर दुसऱ्या युजरने गंमतीत लिहिले की, 'मला नुकतीच पर्स लक्षात आली, ती खूप मोठी आहे.'

अधिक वाचा : कोरेगाव भीमा प्रकरणात शरद पवारांचा खोटेपणा उघड

जाणून घ्या दिशाच्या बॅगेची किंमत 

लक्षणीय बाब म्हणजे दिशाची ज्या बॅगेवरून खिल्ली उडवली जात आहे की बॅग खूप महाग आहे. ईटाइम्सच्या वृत्तानुसार, या बॅगेची किंमत तब्बल ४६ हजार रूपये आहे. दरम्यान चाहत्यांना या बॅगेची किंमत ऐकून देखील धक्का बसला आहे आणि याची किंमत पाहिल्यावर देखील चाहते दिशा पटानीला ट्रोल करत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ETimes (@etimes)

वर्कफ्रंट

दरम्यान, दिशाच्या वर्कफ्रंटबाबत भाष्य करायचे झाले तर, दिशा अभिनेता जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर आणि तारा सुतारियासोबत 'एक व्हिलन २' चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'योद्धा' या चित्रपटातही दिसणार आहे. सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा दिग्दर्शित हा चित्रपट नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी