Yami Gautam : मुंबई : आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या यामीचा (Yami Gautam Birthday)आज वाढदिवस आहे. 28 नोव्हेंबर 1988 रोजी हिमाचलमध्ये जन्मलेली यामी (Yami Gautam)चंदिगडमध्ये मोठी झाली. त्यांच्या वडिलांचे नाव मुकेश गौतम असून ते पंजाबी चित्रपट दिग्दर्शक आहेत. टीव्ही सीरियल्समधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारी यामी गौतम आज फिल्मी जगतातील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
तुम्हाला माहित आहे का ? caknowledge.com च्या रिपोर्टनुसार, यामी गौतमीकडे 2021 मध्ये एकूण 36 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
ती एका महिन्यात 50 लाखांहून अधिक कमावते आणि तिचे उत्पन्न एका वर्षात 7 कोटींहून अधिक आहे (yami gautam income) यामीचे चंदीगडमध्ये आलिशान घर आहे. रिपोर्ट्सनुसार, या घराची (yami gautam house) किंमत जवळपास 2 कोटी रुपये आहे.
ती मुंबईतही एका आलिशान घरात राहते.
तिच्याकडे अनेक स्थावर मालमत्ता देखील आहेत. इतकंच नाही तर यामीला (यामी गौतमीचं कार कलेक्शन) महागड्या आणि शाही गाड्यांची खूप आवड आहे. तिच्याकडे Audi A4, Audi Q7 अशा अनेक गाड्या आहेत.
यामी गौतम एका चित्रपटासाठी १ ते २ कोटी रुपये मानधन घेते. यासोबतच चित्रपटाच्या नफ्यातही तिचा वाटा आहे. ब्रँड एंडोर्समेंटसाठी ही अभिनेत्री एक कोटी रुपये घेते. यामीने 4 जून 2021 रोजी चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक आदित्य धरशी लग्न केले.
लोकांना यामीबद्दल सर्व काही माहित आहे, परंतु तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतोय. यामीने छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.चांद के पार चलो था' ही त्यांची पहिली टीव्ही मालिका होती. यामीला लहानपणी आयएएस अधिकारी व्हायचे होते, पण नशिबाने काही वेगळेच ठरवले होते.
यामी गौतम ही नव्या पिढीतील अभिनेत्रींमधील लोकप्रिय अभिनेत्री असून तिच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक झाले आहे. बॉलीवूडमध्ये यामीने आपला वेगळा ठसा उमटवला असून तिने वेगवेगळ्या चित्रपटांमधील आपल्या भूमिकांद्वारे छाप सोडली आहे. ती आपल्या कामाने नेहमीच आपल्याकडे लक्ष वेधून घेत असते. विकी कौशल, आयुमान खुराणासारख्या अनेक आघाडीच्या कलाकारांबरोबर तिने काम केले आहे. तिच्या चित्रपटांमधील भूमिकांचे कौतुक झाले असून आगामी काळात यामी आपल्या अभिनयाद्वारे अधिकाधिक प्रेक्षकांच्या पसंतीत उतरण्याची चिन्हे आहेत. तिचा स्वत:चा असा मोठा चाहता वर्ग या कालावधीत तयार झाला आहे. नवीन पिढीतील अभिनेते आणि अभिनेत्री ज्यांनी फार कमी कालावधीत बॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवत मोठे व्यावसायिक यश मिळवले आहे अशा कलाकारांमध्ये यामी गौतमचा समावेश होतो. अभिनयाबरोबरच व्यवसायिक यश यांचा उत्तम ताळमेळ यामीने साधला आहे. शिवाय यात तिला मॉडेलिंगचीही मोठी साथ मिळाली आहे. सध्या यामी अनेक ब्रॅंडच्या जाहिराती करताना दिसते.