The Railway Men : YRF ने पहिल्या मेगा बजेट वेब सीरिजची केली घोषणा, 'द रेल्वे मेन', इरफानचा मुलगा बाबिल मुख्य कलाकारांमध्ये

Bhopal Gas Tragedy : द रेल्वे मेन मालिकेची कथा चार मुख्य पात्रांभोवती फिरणार आहे. या भूमिका केके मेनन आर माधवन दिव्येंदू आणि इरफानचा मुलगा बाबिल खान यांनी साकारली आहे. फर्स्ट लूक पोस्टरवर या चार पात्रांचे चेहरे अर्धे झाकलेले दाखवले आहेत.

 yrf entertainment announces first mega budget web series the railway men
'द रेल्वे मेन', इरफानचा मुलगा बाबिल मुख्य कलाकारांमध्ये  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीतील शक्तिशाली प्रोडक्शन हाऊस असलेली यशराज फिल्म्स (Yash Raj Films ) OTT कंटेंटच्या क्षेत्रात प्रवेश करत आहे
  • सुरुवात मेगा-बजेट वेब सीरिजने होणार आहे.
  • 'द रेल्वे मेन' या पहिल्या OTT प्रोजेक्टची घोषणा गुरुवारी YRF एंटरटेनमेंटच्या इन्स्टाग्राम पेजवर करण्यात आली.

Irfan Khan son debute Web serise : नवी दिल्ली ।  काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीतील शक्तिशाली प्रोडक्शन हाऊस असलेली यशराज फिल्म्स (Yash Raj Films ) OTT कंटेंटच्या क्षेत्रात प्रवेश करत आहे आणि त्याची सुरुवात मेगा-बजेट वेब सीरिजने होणार आहे. आता YRF ने त्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. YRF एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली यशराज फिल्म्स OTT प्रोजेक्टची निर्मिती करणार आहे. ( yrf entertainment announces first mega budget web series the railway men irrfan khan son babil joins lead cast web series review)

'द रेल्वे मेन' या पहिल्या OTT प्रोजेक्टची घोषणा गुरुवारी YRF एंटरटेनमेंटच्या इन्स्टाग्राम पेजवर करण्यात आली. या वेब सिरीजचे फर्स्ट लूक पोस्टर आणि टीझरही शेअर करण्यात आला आहे. यासोबत असे सांगण्यात आले की 1984 मधील भोपाळ गॅस दुर्घटनेतील नायकांना समर्पित आहे, ज्यांनी लोकांच्या सेवेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. शिव रवैल या मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत. ही वेब सिरीज एक वर्षानंतर 2 डिसेंबर रोजी प्रसारित होणार आहे.

मालिकेची कथा चार मुख्य पात्रांभोवती फिरणार आहे. केके मेनन (kk menon), आर माधवन (R. Madhavan), दिव्येंदू (Divyendu) आणि इरफानचा मुलगा बाबिल खान ( Babil Khan) यांनी या भूमिका साकारल्या आहेत. फर्स्ट लूक पोस्टरवर हे चार पात्र अर्धे चेहरे झाकलेले दाखवले आहेत.

या प्रकल्पाशी निगडीत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना, बाबिलने लिहिले – YRF च्या पहिल्या OTT प्रकल्प द रेल्वे मॅनचा भाग होण्याचा मान मिळाला. 1984 च्या भोपाळ गॅस दुर्घटनेतील नायकांना श्रद्धांजली. 37 वर्षांपूर्वी अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या या लोकांना मी सलाम करतो.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Babil (@babil.i.k)

काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की YRF चे प्रमुख आदित्य चोप्रा यांनी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी सुमारे पाचशे कोटींचे बजेट ठेवले आहे. त्यासाठी कन्टेंटवर वेगाने काम सुरू आहे. आदित्य चोप्राने पहिली वेब सिरीज बनवण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे. चार हिरोंच्या वेब सीरिजचे बजेट शंभर कोटींच्या आसपास असल्याचे सांगण्यात आले. केके मेनन, माधवन आणि दिव्येंदू हे ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करत आहेत आणि त्यांच्या नावावर यशस्वी वेब सिरीज आहेत. केके मेनन नुकताच स्पेशल ऑप्स १.५ मध्ये दिसला होता. त्याच वेळी, माधवनच्या नावावर ब्रीद सारखी मालिका आहे आणि आता तो नेटफ्लिक्सच्या डेकॅप्डमध्ये दिसणार आहे. त्याच वेळी, दिव्येंदू मिर्झापूरसारख्या यशस्वी वेब सीरिजचा भाग आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी