'ड्रीम गर्ल' सिनेमाची दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई

बी टाऊन
Updated Sep 15, 2019 | 22:38 IST

बॉलिवूड अॅक्टर आयुष्मान खुरानाचा ड्रीम गर्ल सिनेमानं दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. सिनेमात पूजा बनलेल्या आयुष्मान खुरानाला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळत आहे.

Ayushmann Khurrana film dream girl
'ड्रीम गर्ल' सिनेमाची दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई 

थोडं पण कामाचं

  • बॉलिवूड अॅक्टर आयुष्मान खुरानाचा सिनेमा ड्रीम गर्ल  रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धमाकेदार प्रदर्शन करत आहे.
  • सिनेमात पूजा बनून आयुष्माननं प्रेक्षकांची मनं जिंकायला सुरूवात केली आहे.
  • कॉमेडी आणि ड्रामानं भरलेला ह सिनेमात प्रेक्षकांकडून जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहेत.

बॉलिवूड अॅक्टर आयुष्मान खुरानाचा सिनेमा ड्रीम गर्ल  रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धमाकेदार प्रदर्शन करत आहे. सिनेमात पूजा बनून आयुष्माननं प्रेक्षकांची मनं जिंकायला सुरूवात केली आहे. कॉमेडी आणि ड्रामानं भरलेला ह सिनेमात प्रेक्षकांकडून जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहेत. या सिनेमानं रिलीजसोबतच रेकॉर्ड केला आहे. पहिल्या दिवशीच्या आकड्यानुसार ड्रीम गर्ल आयुष्मान खुरानाचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा बनला आहे. फिल्म क्रिटिक्स तरण आदर्शनं दुसऱ्या दिवशीची सिनेमानं केलेली कमाई शेअर केली आहे.

फिल्म क्रिटिक्स तरण आदर्शनुसार ड्रीम गर्लनं दुसऱ्या दिवशी 16 कोटींची कमाई केली आहे. असं म्हटलं जात आहे की, आयुष्मान खुरानाचा हा सिनेमा बऱ्याच कालावधीसाठी सिनेमाहॉलमध्ये टिकून राहिल. सिनेमात आयुष्मान खुरानाच्या अपोझिट नुसरत भरूचा मुख्य भूमिकेत दिसत आहे.

पहिल्या दिवशी सिनेमानं 10.5 कोटी रूपयांची कमाई केली होती. या सिनेमानं आतापर्यंत एकूण 26.47 कोटी रूपयांची कमाई केली आहे. ड्रीम गर्लच्या कमाईत दुसऱ्या दिवशी 63.38 टक्क्यांचा कलेक्शन झालं आहे. मेट्रो, टीयर 2 आणि टीयर 3 च्या शहरामंध्ये सिनेमानं चांगली कमाई केली आहे. 

आयुष्मान बॉलिवूडमध्ये लागोपाठ एकापाठोपाठ एक हिट सिनेमा देऊन स्टार अॅक्टरच्या यादीत आला आहे. गेल्या वर्षी आयुष्मान खुरानाचा सिनेमा अंधाधुन आणि बधाई हो बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट झाला होता. अंधाधुन सिनेमानं बरेच अॅवॉर्ड आपल्या नावावर जमा केले.बॉलिवूडमध्ये आयुष्मान खुरानानं वेगवेगवळ्या जॉनरच्या भूमिका साकारत स्वतःला एक यशस्वी अॅक्टर म्हणून सिद्ध केलं आहे. 

सिनेमात डायलॉग आणि आयुष्मान खुरानाची जबरदस्त अॅक्टिंग लोकांना हसण्यासाठी भाग पाडते. सिनेमात आयुष्मान खुराना आणि नुसरत भरूचा व्यतिरिक्त मनजोत, अनू कपूर या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...