Yusuf Hussain passes away : अभिनेते युसुफ हुसेन यांचे निधन

Yusuf Hussain passes away : बॉलिवूड अभिनेते युसुफ हुसेन यांचे निधन झाले. निर्माते आणि युसुफ यांचे जावई हंसल मेहता यांनी सोशल मीडियावरुन युसुफ हुसेन यांच्या निधनाची माहिती दिली.

Yusuf Hussain passes away
अभिनेते युसुफ हुसेन यांचे निधन 
थोडं पण कामाचं
  • अभिनेते युसुफ हुसेन यांचे निधन
  • हंसल मेहता यांनी सोशल मीडियावरुन युसुफ हुसेन यांच्या निधनाची माहिती दिली
  • युसुफ हुसेन यांची मुलगी सफीना हुसेन यांचे लग्न हंसल मेहता यांच्याशी झाले आहे

Yusuf Hussain passes away । मुंबईः बॉलिवूड अभिनेते युसुफ हुसेन (Yusuf Hussain )यांचे निधन झाले. निर्माते आणि युसुफ यांचे जावई हंसल मेहता (Hansal Mehta)यांनी सोशल मीडियावरुन युसुफ हुसेन यांच्या निधनाची माहिती दिली. युसुफ हुसेन यांनी रईस, धूम २, दिल चाहता है, ओह माय गॉड, विवाह, राज, हजारों ख्वाइशे ऐसी, शाहिद, क्रिश ३, दबंग ३, द ताश्कंद फाइल्स, जलेबी, खोया खोया चांद, क्रेजी कुक्कड फॅमिली, रोड टू संगम या सिनेमांमध्ये तसेच सीआयडी, तुम बिन जाऊ कहां, कुमकुम : एक प्यारा सा बंधन, श्श्शू... कोई है, मुल्ला नसरुद्दीन या टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या. 

युसुफ हुसेन यांनी २०१२ मध्ये 'इटाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत तीन वेळा लग्न केल्याचे सांगितले होते. अजून चांगल्या जोडीदाराचा शोध सुरू आहे. मी कदाचित वयाची साठी ओलांडली आहे त्यामुळे हा शोध या जन्मात पूर्ण होईल असे वाटत नाही; असेही युसुफ हुसेन म्हणाले होते. 

युसुफ हुसेन यांची मुलगी सफीना हुसेन यांचे लग्न हंसल मेहता यांच्याशी झाले आहे. पण युसुफ हुसेन आणि हंसल मेहता यांच्यात सासरा-जावई या नात्यापेक्षा वडील-मुलगा असे अधिक जवळचे नाते निर्माण झाले होते. यामुळेच युसुफ हुसेन यांच्या निधनाने हंसल मेहता यांना जास्त दुःख झाले.

हंसल मेहता यांनी युसुफ हुसेन यांच्या निधनाचे वृत्त देताना 'सासरे नाही तर वडील असलेले युसुफ हुसेन साहेब आता या जगात नाहीत... त्यांना मी मिस करेन... आज मी खरच अनाथ झालो... माझे उर्दूचे शिक्षण अपूर्णच राहिले... आता आयुष्य पहिल्यासारखे नसेल... अशा स्वरुपाची पोस्ट सोशल मीडियावर टाकली. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी युसुफ हुसेन यांच्या निधनाचे वृत्त कळताच शोक व्यक्त केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी